अहमदनगर मतदारसंघात 64.26 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:50 PM2019-04-24T12:50:55+5:302019-04-24T12:51:54+5:30

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले.

Ahmednagar constituency has 64.26 percent voting | अहमदनगर मतदारसंघात 64.26 टक्के मतदान

अहमदनगर मतदारसंघात 64.26 टक्के मतदान

Next

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले. सर्वा धिक मतदान राहुरी मतदारसंघात झाले असून सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर मतदारसंघात झाले आहे. काल सायंकाळी ६ वाजेपर्यत मतदान सुरळितपणे पार पडले. भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यासह १७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे.
अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान झाले. नवमतदारांचा उत्साह, ज्येष्ठ नागरिकांनी मतदानासाठी लावलेल्या रांगा, सखी मतदान केंद्राच्या संकल्पनेने मतदारांमधील उत्सुकता ही या निवडणुकीची वैशिष्ट्ये ठरली. मतदानाची अंतिम आकडेवारी आज हाती आली.
शेवगावमध्ये ६३.४० टक्के, राहुरी ६६.७७ टक्के, पारनेर ६६.१० टक्के, अहमदनगर शहर ६०.२५ टक्के, श्रीगोंदा ६४.७५ तर कर्जत-जामखेडमध्ये ६४.१० टक्के मतदान झाले. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Web Title: Ahmednagar constituency has 64.26 percent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.