अहमदनगर मतदारसंघात 3 वाजेपर्यत 37.91 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 02:57 PM2019-04-23T14:57:09+5:302019-04-23T15:25:08+5:30

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.

The Ahmednagar constituency has 28 percent voting till 1 pm | अहमदनगर मतदारसंघात 3 वाजेपर्यत 37.91 टक्के मतदान

अहमदनगर मतदारसंघात 3 वाजेपर्यत 37.91 टक्के मतदान

Next

अहमदनगर :अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यत 37.91 टक्के मतदान मतदारसंघात झाले. दुपारी 1 वाजेपर्यत आतापर्यत सवार्धिक मतदान अहमदनगर शहरात झाले असून श्रीगोंदा व शेवगावमध्ये २६ टक्के मतदान झाले आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप, आदर्श गाव हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनी सकाळीच मतदान केले. भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी सकाळी विशाल गणपतीचे दर्शन घेऊन मतदान केंद्राला भेटी दिल्या. विखे यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघात नाव आहे, त्यामुळे त्यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदारन करता येणार नाही.
दुपारी 1  वाजेपर्यतशेवगावमध्ये २६ टक्के, राहुरी २७ टक्के, पारनेर २९ टक्के, अहमदनगर शहर ३२ टक्के, श्रीगोंदा २६ तर कर्जत-जामखेडमध्ये २९ टक्के मतदान झाले. सरासरी २८.३४ टक्के मतदान झाले.

Web Title: The Ahmednagar constituency has 28 percent voting till 1 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.