Maharashtra Election 2019 ; Vani Vidhan Sabha constituency polls from 6 centers | Maharashtra Election 2019 ; वणी विधानसभा मतदार संघात ३२३ केंद्रांवरून मतदान
Maharashtra Election 2019 ; वणी विधानसभा मतदार संघात ३२३ केंद्रांवरून मतदान

ठळक मुद्दे१४ केंद्र संवेदनशील : दोन लाख ८४ हजार ५८४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क, चोख पालीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून सोमवारी वणी विधानसभा मतदार संघात ३२३ केंद्रांवरून मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या निवडणुकीत या मतदार संघातील दोन लाख ८४ हजार ५८४ मतदार निवडणुकीचा हक्क बजावतील. यात एक लाख ४७ हजार ५९६ पुरूष मतदार, तर एक लाख ३६ हजार ९८८ महिला मतदारांचा समावेश आहे.
दरम्यान, रविवारी दुपारनंतर निवडणूक पथके आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झालेत. वणी विधानसभा मतदार संघात १४ मतदान केंद्रे संवेदनशील असून त्यात चिखलगाव येथील दोन, उकणी येथील एक, भालर येथील दोन, तरोडा येथील एक, घोन्सा येथील एक, शिंदोला येथील एक, कुरई येथील एक, राजूर येथील दोन, तर वणी येथील तीन मतदान केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी चार निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. असे एकूण एक हजार २९२ अधिकारी, कर्मचारी रविवारी दुपारनंतर आपापल्या मतदान केंद्रांकडे साहित्यासह रवाना झाले आहेत. सोमवारी सकाळी ७ वाजतपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार असून सायंकाळी ६ वाजतानंतर ही प्रक्रिया संपणार आहे.
निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण वणी विधानसभा मतदार संघात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. २० पोलीस अधिकारी व ५०० पोलीस कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील. मध्यप्रदेशातूनही बंदोबस्तासाठी जादा कुमक बोलविण्यात आली आहेत. तेथील सुमारे १०० कर्मचारी अधिकारीदेखील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक प्र्रक्रीया शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न ्रकरीत आहे.
 


Web Title: Maharashtra Election 2019 ; Vani Vidhan Sabha constituency polls from 6 centers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.