Maharashtra Election 2019 ; सात मतदारसंघ अन् सात तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:00 AM2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:02+5:30

२४ ऑक्टोबरला मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. सातही विधानसभा क्षेत्रात उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ही मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ८ वाजतापासून ही प्रक्रिया सुरू होईल. प्रारंभी बॅलेट पेपरची मते मोजली जाणार आहे. यानंतर ईव्हीएमच्या मतांची मोजणी प्रारंभ होणार आहे. एका वेळी १४ टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

Maharashtra Election 2019 ; Seven constituencies and seven hours | Maharashtra Election 2019 ; सात मतदारसंघ अन् सात तास

Maharashtra Election 2019 ; सात मतदारसंघ अन् सात तास

Next
ठळक मुद्देनिवडणूक : यवतमाळचा निकाल येणार सर्वात शेवटी, एका फेरीला १५ मिनिटे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रातील निकाल सात तासात हाती येणार आहेत. पुसद आणि वणी विधानसभा क्षेत्राचा निकाल सर्वात आधी, तर यवतमाळ विधानसभा क्षेत्राचा निकाल सर्वात शेवटी हाती येणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात १४ टेबलवर मतमोजणी होणार असून मोजणीची प्रत्येक फेरी १५ ते २० मिनिटांत आटोपणार आहे.
२४ ऑक्टोबरला मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. सातही विधानसभा क्षेत्रात उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ही मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ८ वाजतापासून ही प्रक्रिया सुरू होईल. प्रारंभी बॅलेट पेपरची मते मोजली जाणार आहे. यानंतर ईव्हीएमच्या मतांची मोजणी प्रारंभ होणार आहे. एका वेळी १४ टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सुपरवायजर, एक सहायक, एक सूक्ष्म निरीक्षक, प्रत्येक उमेदवाराचा एक सहायक प्रतिनिधी राहील, असे संपूर्ण नियोजन निवडणूक विभागाने केले आहे. प्रत्येक फेरीचा निकाल फेरीनिहाय जाहीर केला जाणार आहे. त्याकरिता ध्वनीक्षेपकाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतांची ‘टॅली’ करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातून ५ व्हीव्हीपॅट आणि त्याच मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिनची उमेदवारांना पडलेली मते मोजली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी निकाल जाहीर करणार आहेत.
सातही क्षेत्रांचे निकाल जिल्हाधिकारी कार्यालयात देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉलमध्ये तशी अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

या सात ठिकाणी होणार मतमोजणी
वणी विधानसभा क्षेत्राची मतमोजणी वरोरा रोडवरील शासकीय गोदामात पार पडणार आहे. राळेगाव विधानसभा क्षेत्राची मतमोजणी राळेगावातील नवीन प्रशासकीय इमारतीत पार पडणार आहे. यवतमाळ विधानसभा क्षेत्राची मतमोजणी धामणगाव मार्गावरील तंत्रनिकेतनमध्ये पार पडणार आहे. दिग्रस विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी दारव्ह्यातील यवतमाळ रोडवरील शासकीय गोदामात पार पडणार आहे. आर्णी विधानसभा क्षेत्राची मतमोजणी पांढरकवड्यातील चालबर्डी रोडवरील बाजार समितीच्या गोदामात पार पडणार आहे. पुसद विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी प्रक्रिया पुसदमधील यशवंत रंगमंदिरातील क्रीडा संकुलात पार पडणार आहे. उमरखेड विधानसभा क्षेत्राची मतमोजणी महागाव रोडवरील शासकीय धान्य गोदामात पार पडणार आहे.

मतमोजणीच्या फेऱ्या
वणी मतदारसंघ - २३
राळेगाव मतदारसंघ - २५
यवतमाळ मतदारसंघ - २९
दिग्रस मतदारसंघ - २७
आर्णी मतदारसंघ - २६
पुसद मतदारसंघ - २३
उमरखेड मतदारसंघ - २४

Web Title: Maharashtra Election 2019 ; Seven constituencies and seven hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.