वसईतील गणेशोत्सव मंडळांना दिलासा;. क्षितिज ठाकूर यांच्या पाठपुरवठ्याने परवाना शुल्क केले 100 टक्के माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 03:44 PM2020-08-15T15:44:02+5:302020-08-15T15:44:20+5:30

मंडप व अग्निशमन शुल्क होते 4500 ; मात्र आता आयुक्तांनी घेतला निर्णय सब कुछ माफ

Consolation to Ganeshotsav Mandals in Vasai; Kshitij Thakur's follow-up license fee 100 percent waived | वसईतील गणेशोत्सव मंडळांना दिलासा;. क्षितिज ठाकूर यांच्या पाठपुरवठ्याने परवाना शुल्क केले 100 टक्के माफ

वसईतील गणेशोत्सव मंडळांना दिलासा;. क्षितिज ठाकूर यांच्या पाठपुरवठ्याने परवाना शुल्क केले 100 टक्के माफ

Next

- आशिष राणे

वसई :सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून परवानगी साठी घेण्यात येणारे परवाना शुल्क यंदा वसई विरार महापालिकेने १०० टक्के माफ केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम.क्षितिज ठाकूर व  माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी वसईत १०० टक्के शुल्क माफीची मागणी केल्यानंतर स्वातंत्र्य दिनी महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी तसा आदेश निर्गमित केला असल्याची माहिती महापौर शेट्टी यांचे स्वीय सचिव दिगंबर पाटील यांनी लोकमत ला दिली, अर्थातच  हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याने वसईतील गणेशोत्सव मंडळांना मोठा  दिलासा मिळाला आहे. 

गणेशोत्सव निमित्ताने दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महानगरपालिकेकडून मंडप व अग्निशमन विभागाकडिल नाहरकत प्रमाणपत्र शुल्क भरणे आवश्यक व बंधनकारक आहे. यंदा देखील पालिकेतर्फे ते आकारण्यात येत होते. तसेच दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. यासाठी वसईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे देखील साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहेत. त्यातच यंदा  वर्गणी गोळा करायची नसल्याने बहुतांश मंडळांची  आर्थिक परिस्थिती पाहता परवानगीसाठी लागणारे शुल्क मंडळांना महानगरपालिकेला भरता येणे शक्य नाही. यासाठीच ते माफ करावे अशी मागणी आम. क्षितिज ठाकूर व  माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी यांच्याकडे केली होती.

तर या शुल्कात 50  टक्के सवलत देण्याचे शुक्रवारी आयुक्तांनी जाहीर केले होते.  मात्र शनिवारी स्वातंत्र्य दिनी सोहळ्यात याबाबत आमदार क्षितिज ठाकूर व  माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी आयुक्तांशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर त्यांची मागणी मान्य करत यंदा कोरोनाचे सावट असल्याने गणोशोत्सवा करिता लागणारी मंडप परवानगी व अग्निशमन परवानगी असे एकूण शुल्क  4 हजार 500 रुपये सरसकट माफ केल्याचे जाहिर केले व तसे आदेश संबंधीत सर्व प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांना निर्गमित केले असल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. एकूणच या महत्त्वाच्या निर्णयामुळे वसईतील सर्व गणेशोत्सव मंडळांना कोरोना संकट डोक्यावर असताना एक प्रकारे आर्थिक दिलासाच जणू  मिळाला आहे.त्यामुळे भक्त व करदात्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Consolation to Ganeshotsav Mandals in Vasai; Kshitij Thakur's follow-up license fee 100 percent waived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.