Wardha election results; Sameer Kunawar Vs Raju Timande, Dr. Pankaj Bhoyar Vs Shekhar Shende, Dadarao Keche Vs Amar Kale, | वर्धा निवडणूक निकाल; वर्ध्यात कुणावार, भोयर आणि केचे विजयी; काँग्रेसला एक जागा

वर्धा निवडणूक निकाल; वर्ध्यात कुणावार, भोयर आणि केचे विजयी; काँग्रेसला एक जागा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांपैकी तीन मतदार संघात भारतीय जनता पार्टीने विजय मिळविला आहे. गेल्यावेळी दोन जागांवर भारतीय जनता पार्टीचे आमदार होते. तर दोन जागा काँग्रेसकडे होत्या. यावेळी आर्वीची जागा काँग्रेसकडून भाजपने खेचून आणली आहे. वर्धा मतदार संघात भाजपचे डॉ. पंकज भोयर यांनी काँग्रेस उमेदवारासोबत निकरीची झुंज देवून विजयश्री संपादन केला. तर हिंगणघाटमध्ये समीर कुणावार यांनी एकतर्फी विजय मिळविला. आर्वी विधानसभा मतदार संघात यावेळी काँग्रेसला पराभव पहावा लागला. माजी आमदार दादाराव केचे हे येथून विजयी झालेत. देवळी मतदार संघात भाजप-सेनेत बंडखोरी झाल्याने सेनेचे समीर देशमुख पराभूत झाले. येथे भाजपचा बंडखोर अपक्ष उमेदवार राजेश बकाणे दुसऱ्या स्थानी राहिले.

विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते

आर्वी मतदारसंघ- दादाराव केचे - भाजप - ६१,९२२
देवळी मतदारसंघ - रणजित कांबळे- काँग्रेस-४३,८४०
हिंगणघाट मतदारसंघ- समीर कुणावार-भाजप-१,०३,७६८
वर्धा मतदारसंघ- डॉ. पंकज भोयर-भाजप-६२,०१६

निकालाचे विश्लेषण

देवळी विधानसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा काँग्रेसने विजय मिळविला.
हिंगणघाटातून भाजपचे समीर कुणावार तर वर्ध्यातून भाजपाचे डॉ. पंकज भोयर दुसऱ्यांदा विजयी झाले.
राहुल गांधी यांची आर्वी येथे सभा होऊनही काँग्रेस उमेदवाराला येथे विजय मिळविता आला नाही.
वर्धा मतदार संघात काँग्रेसचा सलग तिसऱ्यांदा पराभव झाला.
हिंगणघाट मतदार संघात कुणावार यांचे मताधिक्य घटले

Web Title: Wardha election results; Sameer Kunawar Vs Raju Timande, Dr. Pankaj Bhoyar Vs Shekhar Shende, Dadarao Keche Vs Amar Kale,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.