Maharashtra Election 2019 ; देशातील सर्वांत मोठी शेतकरी कर्जमाफी राज्यात झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:40+5:30

मुख्यमंत्री म्हणाले, आज काँग्रेसचे नेते प्रचार करायला तयार नाहीत, कारण त्यांना आपला पराभव दिसत आहे. म्हणूनच राहुल गांधी विदेशात गेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहिरनामा म्हणजे ते १५-२० वर्षे निवडून येणार नाहीत, असा आहे. त्या जाहिरनाम्यात जगभरातील सर्व आश्वासने दिली आहेत.

Maharashtra Election 2019 ; The largest farmers in the country got loan waiver in the state | Maharashtra Election 2019 ; देशातील सर्वांत मोठी शेतकरी कर्जमाफी राज्यात झाली

Maharashtra Election 2019 ; देशातील सर्वांत मोठी शेतकरी कर्जमाफी राज्यात झाली

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस: कारंजा येथे जाहीर सभेत विरोधकांवर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : राज्यातील शेतकऱ्यांना देशातील आजपर्यंतची सर्वांत मोठी कर्जमाफी भाजप-सेना सरकारने दिली. त्या कर्जमाफीचे काम अजूनही सुरू आहे. दुष्काळ, अनुदान बोंडअळी अनुदान, ट्रॅक्टरचे अनुदान अशा शेतकरी हिताच्या अनेक योजना भाजप शिवसेना सरकारने ५ वर्षांत राबविल्या. ५ वर्षांत ५० हजार कोटींची विकासकामे केलीत. राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण झालेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी कारंजा (घा) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सभा मंचावर माजी आ. दादाराव केचे, आ. डॉ. रामदास आंबटकर, जि.प.च्या उपाध्यक्ष कांचन नांदुरकर सर्व जि.प. सदस्य, पं.स. सदस्य व कारंजा येथील भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, आज काँग्रेसचे नेते प्रचार करायला तयार नाहीत, कारण त्यांना आपला पराभव दिसत आहे. म्हणूनच राहुल गांधी विदेशात गेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहिरनामा म्हणजे ते १५-२० वर्षे निवडून येणार नाहीत, असा आहे. त्या जाहिरनाम्यात जगभरातील सर्व आश्वासने दिली आहेत. या भागाचे विद्यमान आमदार हे निष्क्रिय असून एकदाही ते माझ्याकडे जनसामान्यांच्या कामाकरिता आले नाहीत. आपण आर्वी विधानसभा क्षेत्राकरिता १,३०० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केलीत. काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांच्या १५ वर्षांच्या कामांचा हिशेब द्यावा. जनतेने १५ वर्षे त्यांची व भाजपची ५ वर्षे यातील कामांची तुलना करावी, असे आवाहन त्यांनी केले. जलयुक्त शिवार, नदीचे पुनरुज्जीवन, ५ लाख लोकांना कृषिपंप, ड्रायपोर्टची निर्र्मिती अशी अनेक विकासात्मक कामे सरकारने केलीत. येत्या पाच वर्षांत कारंजा तालुक्याच्या कार नदी उपसा सिंचन प्रकल्पाला पहिल्यांदा पूर्णत्वास नेण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी आर्वी विधानसभेचे राष्ट्रवादीचे नेते संदीप दिलीप काळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. सभेचे संचालन दिलीप जसुतकर यांनी केले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; The largest farmers in the country got loan waiver in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.