Maharashtra Election 2019 ; Demonstration of power of Sameer Deshmukh from rally in Deoli constituency | Maharashtra Election 2019 ; देवळी मतदारसंघात रॅलीतून समीर देशमुखांचे शक्तिप्रदर्शन
Maharashtra Election 2019 ; देवळी मतदारसंघात रॅलीतून समीर देशमुखांचे शक्तिप्रदर्शन

ठळक मुद्देपुलगावसह ठिकठिकाणी निघाली रॅली।

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : शिवसेनेचे उमेदवार समीर देशमुख यांच्या निवडणूक प्रचारार्थ देवळीसह मतदार संघात अनेक गावात रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सकाळी देवळी येथे खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने ही रॅली फिरवून पक्षाच्या ध्येयधोरणाचा जयजयकार करण्यात आला. यावेळी युतीचे उमेदवार समीर देशमुख, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, डॉ. शिरीष गोडे, पंचायत समिती सभापती विद्या भुजाडे, जि.प. चे माजी सभापती मिलिंद भेंडे, न. प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, गटनेत्या शोभा तडस, जि. प. सदस्य मयुरी मसराम तसेच न. प. सभापती नंदू वैद्य, शिवसेनेचे अनंता देशमुख यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारप्रमाणे राज्यात भाजप-सेना युतीचे लोकप्रिय सरकार आणावयाचे आहे. लोकसभा मतदार क्षेत्रात ज्याप्रमाणे मला भरघोस मतांनी विजयी केले, त्याचप्रमाणे या ठिकाणी युतीचे उमेदवार समीर देशमुख यांना विजयी करावयाचे आहे, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी जाहीर सभेत केले.
या सभेला नगरसेवक नंदू वैद्य यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रचार रॅलीत न. प. सदस्य मारोती मरघाडे, संध्या कारोटकर, सुनीता ताडाम, सुनीता बकाणे, सारिका लाकडे, शिवसेनेचे महेश जोशी, दशरथ भुजाडे, दिलीप कारोटकर, संजय ताडाम, वैभव कडू, उमेश कामडी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यानंतर समीर देशमुख यांच्या प्रचारार्थ पुलगाव येथेही शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर, भाजपाचे नेते संजय गाते, मंगेश झाडे, अ‍ॅड. विद्याधर माखणे, दिलीप पटले, विनय मेटे, विनोद बाभुळकर, निलेश गुल्हाणे, संदीप कुचे, सलीम हुसैन, आशीष पांडे, सागर टाके यांच्यासह शिवसेना भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मतदार संघातील अल्लीपूर, तरोडा, तळेगाव (टालाटुले), भिडी, अंदोरी, आंजी (मोठी), वायफड, वायगाव (नि.), गुजखेडा, इंझाळा, कानगाव आदी भागातही शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी समीर देशमुख यांच्या प्रचारार्थ रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले.


Web Title: Maharashtra Election 2019 ; Demonstration of power of Sameer Deshmukh from rally in Deoli constituency
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.