Maharashtra Election 2019 ; आता होताहेत दावे-प्रतिदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:00 AM2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:09+5:30

आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभेत झालेल्या मतदानाची तुलना केली असता वर्धा यंदा पिछाडीवर राहिला आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रातील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ४७ उमेदवारांचे राजकीय भविष्य ईव्हीएम मध्ये सील बंद झाले असून सध्या उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

Maharashtra Election 2019 ; Claims are now under way | Maharashtra Election 2019 ; आता होताहेत दावे-प्रतिदावे

Maharashtra Election 2019 ; आता होताहेत दावे-प्रतिदावे

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ६१.७६ टक्के मतदान : वर्धा विधानसभा मतदारसंघ पिछाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सोमवारी काही मतदान केंद्रावर सायंकाळी ६ च्या पूर्वी मतदारांनी एकच गर्दी केल्याने रात्री उशीरापर्यंत अनेक मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान सुरूच होते. त्यानंतर जिल्ह्यात प्रत्यक्ष किती टक्के मतदानांनी मतदानाचा हक्क बजावला याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाला मिळाली. वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात एकूण ६१.७६ टक्के मतदान झाले असून तशी नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभेत झालेल्या मतदानाची तुलना केली असता वर्धा यंदा पिछाडीवर राहिला आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रातील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ४७ उमेदवारांचे राजकीय भविष्य ईव्हीएम मध्ये सील बंद झाले असून सध्या उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. प्राप्त माहितीनुसार वर्धा विधानसभा मतदार संघातील एकूण २ लाख ६२ हजार ३८९ मतदारांपैकी १ लाख ७६ हजार ४५५ मतदारांनी मतदान केले.
देवळी विधानसभा मतदार संघात २ लाख ७५ हजार २३२ मतदारांपैकी १ लाख ७४ हजार ७३४ मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील २ लाख ९५ हजार ९८७ मतदारांपैकी १ लाख ९० हजार ९३० मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले. तर वर्धा विधानसभा क्षेत्रातील ३ लाख १६ हजार ३५० मतदारांपैकी १ लाख ६८ हजार १०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांचा मतदानास उत्स्फुर्त प्रतिसाद
वर्धा, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांनी सोमवारी पार पडलेल्या लोकशाहीच्या उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या चारही विधानसभा मतदार संघातील एकूण ५ लाख ६१ हजार ३९८ महिला मतदारांपैकी ३ लाख २८ हजार ९८० महिला मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. तर १४ पैकी पाच इतर उमेदवारांनीही मतदान केले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील १ लाख २८ हजार ३९८ महिला मतदारांपैकी ८२ हजार १२४ महिला मतदारांनी मतदान केले. देवळी विधानसभा क्षेत्रातील १ लाख ३३ हजार २५३ महिला मतदारांपैकी ८० हजार ७६६ महिला मतदानांनी मतदान केले. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील १ लाख ५२ हजार ६५५ महिला मतदारांपैकी ८७ हजार ८१० महिला मतदानांनी मतदान केले. तर वर्धा विधानसभा क्षेत्रातील १ लाख ५६ हजार ४१५ महिला मतदारांपैकी ७८ हजार २८० महिला मतदानांनी मतदान केले.

उमेदवारांसह मतदारांना निकालाची उत्सुकता
सोमवारी विधानसभा निवडणुकीचा महत्वाचा भाग असलेली प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडली. शिवाय सध्या उमेदवारांचे राजकीय भविष्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहेत. असे असले तरी आता उमेदवारांसह मतदारांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

गुरूवार २४ ऑक्टोबरला जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट व आर्वी या चारही विधानसभा क्षेत्राची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतरच विजयाच्या चर्चेला पुर्ण विराम मिळणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Claims are now under way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा