तालुक्यातील गौरी-गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:00 AM2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:00:47+5:30

तहसील कार्यालयामध्ये सण, उत्सवाच्या प्रार्श्वभूमीवर तहसीलदार राजेश सरवदे यांनी तालुक्यातील पोलीस पाटील व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर उपस्थित होते. सार्वजनिक गणेश उत्सवाचे पावित्र राखण्यासोबतच कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी ग्रामीण भागात पोलीस पाटील व शहरी भागात नगरपालिका अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी.

Don't make Gauri-Ganesh festival public in the taluka! | तालुक्यातील गौरी-गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊ नका !

तालुक्यातील गौरी-गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊ नका !

Next
ठळक मुद्देतहसीलदारांचे निर्देश : देवळी तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आगामी गौरी-गणेश उत्सवाच्या धार्मिक सोहळ्यासोबतच बैल पोळ्याच्या सणाला सार्वजनिक स्वरूप येवू न देता नियमांचे पालन करा. तसेच गर्दी होणार नाही, याची काळजी घेत घरगुती वातावरणात सण साजरे करुन प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन तहसीलदार राजेश सरवदे यांनी दिले.
तहसील कार्यालयामध्ये सण, उत्सवाच्या प्रार्श्वभूमीवर तहसीलदार राजेश सरवदे यांनी तालुक्यातील पोलीस पाटील व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर उपस्थित होते. सार्वजनिक गणेश उत्सवाचे पावित्र राखण्यासोबतच कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी ग्रामीण भागात पोलीस पाटील व शहरी भागात नगरपालिका अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी. शहरी भागात ‘एक मोहल्ला, एक गणपती’ व ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ची संकल्पना रुजविण्याकरिता गावागावात दवंडी द्यावी. सार्वजनिक गणपती चार फुट तर घरगुती गणपती दोन फुट उंचीचा असावा. गणेशाची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरीसची न बसविता पर्यावरणपुरक मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. गणेश स्थापनेची परवानगी शहरीभागात पोलीस स्टेशनकडून व ग्रामीण भागात ग्रामसचिवाकडून घ्यावी. गणेश मूर्ती विक्रीच्या ठिकाणी ग्राहकांची नोंद घेण्याची व्यवस्था करावी. गणेशाचे आगमण व विसर्जनासाठी चार व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा असावी. मोठा मंडप, लाऊडस्पिकर व डिजे न लावता साधेपणाने उत्सवाची तयारी करावी. दर्शनासाठी येणाºया भाविकासाठी थर्मल स्क्रीनिंग व हॅण्डवॉशची व्यवस्था करावी. सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम न घेता त्याऐवजी कोरोना जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय, याबाबतचे कार्यक्रम व आरोग्यविषयक शिबिर घेवून प्रबोधन करावे, आदी सूचना देण्यात आल्या. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसात तक्रार देवून गुन्हा दाखल करावा, असेही निर्देश या बैठकीत देण्यात आले.
पोलीस पाटलांनी मुख्यालयी राहावे
बैलपोळ सार्वजनिक ठिकाणी न भरविता, राहते घरी सजविलेल्या बैलांची पुजा करून सोपस्कर पूर्ण करावे. वाजंत्रीसह बैलांची मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात यावी. कोरोना आजाराचा अपेक्षीत धोका व यासाठी शासकीय नियमांचे पालन करण्याबाबत लोकांना जागृत करण्यात यावे. त्याकरिता पोलीस पाटील यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असून कोणतेही कारण ऐकले जाणार नाही. या कामात टाळाटाळ करणाºयावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही तहसीलदार राजेश सरवदे व पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी पोलीस पाटलांना दिलेत.

Web Title: Don't make Gauri-Ganesh festival public in the taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.