वादळीवाऱ्यासह पावसाचा फटका; वर्धा विभागातील २६ वीज खांब क्षतिग्रस्त

By महेश सायखेडे | Updated: April 19, 2023 18:07 IST2023-04-19T18:06:11+5:302023-04-19T18:07:18+5:30

तब्बल सव्वा किमीच्या विद्युत वाहिनीचे नुकसान

A stormy rainstorm; 26 electricity poles damaged in Wardha division | वादळीवाऱ्यासह पावसाचा फटका; वर्धा विभागातील २६ वीज खांब क्षतिग्रस्त

वादळीवाऱ्यासह पावसाचा फटका; वर्धा विभागातील २६ वीज खांब क्षतिग्रस्त

वर्धा : विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान खात्याच्या वतीने काही दिवसांपूर्वी वर्तविण्यात आला. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरत असला तरी मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होत वर्धा शहरासह परिसरात दामिणी गर्जना, वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

याच वादळी वाऱ्यासह पावसामुळे महावितरणच्या वर्धा विभागातील तब्बल २६ विद्युत खांब क्षतिग्रस्त होत तब्बल सव्वा किमीच्या विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे. येत्या २४ तासांत दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी महावितरण सध्या युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.
 

Web Title: A stormy rainstorm; 26 electricity poles damaged in Wardha division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.