Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
सरकारने 14 क्षेत्रांसाठी पीएलआय योजना सुरू केली आहे. पूर्वी ते 13 क्षेत्रांसाठी होते, नंतर ते एका क्षेत्रासाठी वाढविण्यात आले. याला इंडस्ट्रीकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. ...
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी बाजूनं ठरलेल्या प्रतिक्रिया येतात. सत्ताधारी अर्थसंकल्पाची भलामण करतात, बजेटनं काय काय दिलं सांगतात आणि विरोधक काहीच मिळालं नाही, तोंडाला पानं पुसली म्हणत तुटून पडतात. पण आताच्या अर्थसंकल्पानं ...