Swords of action against 900 employees | ९०० कर्मचाऱ्यांवर कारवाईची तलवार

९०० कर्मचाऱ्यांवर कारवाईची तलवार

ठाणे : वारंवार सूचना, पत्रव्यवहार करूनही निवडणूक प्रशिक्षणवर्गास गैरहजर राहणाºया ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील तब्बल ९०० कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रथम प्रशिक्षणवर्गास हजर राहून दुसºया प्रशिक्षणवर्गास गैरहजर राहणाºया ९०० अधिकारी, कर्मचाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे.


ठाणे जिल्ह्यात निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यानुसार, या कामासाठी शासकीय व निमशासकीय कर्मचाºयांना पाचारण करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात सहा हजार ४८८ मतदानकेंद्रे आहेत. या निवडणुकीच्या कामासाठी ५५ ते ६० हजार कर्मचाºयांची आवश्यकता होती. यामध्ये २०० व्हिडीओग्राफर्स, ७२ भरारी पथके, ८६७ झोनल अधिकारी व तेवढेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवणारे अधिकारी आहेत. त्यानुसार, या कर्मचाºयांना ईव्हीएम मशीन हाताळणे, निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडावी, यासह विविध गोष्टींची माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक निर्णय कार्यालयस्तरावर अधिकारी आणि कर्मचाºयांचे प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पहिल्या प्रशिक्षणवर्गास चांगला प्रतिसाद लाभला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या दुसºया प्रशिक्षणवर्गास अनेकांनी दांडी मारली होती. त्यामुळे अशा ९०० अधिकारी, कर्मचाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबरोबरच त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईदेखील करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली.


सबळ कारण दिलेल्यांचे आदेश रद्द
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतून निवडणुकीच्या कामाचे आदेश रद्द करण्यासाठी सुमारे सात हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले होते. त्यातील ५० टक्के अर्जांत अधिकारी आणि कर्मचाºयांनी वैद्यकीय कारणे दिली आहेत. त्यातील वैद्यकीय कारणांत तथ्य असलेल्या कर्मचाºयांचे आदेश रद्द करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली.

Web Title: Swords of action against 900 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.