Join us  

'स्वराज्य रक्षक संभाजी'च्या फॅन्ससाठी खुशखबर, टिआरपी रेसमध्ये या क्रमांकावर आहे मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 6:23 PM

High TRP Marathi Serials : स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या फॅन्ससाठी खुशखबर असून या मालिकेचा टिआरपी गेल्या काही दिवसांत चांगलाच वाढला आहे.

ठळक मुद्देयेत्या आठवड्यात स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडते.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडते. पण त्याचसोबत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावते आणि त्याचमुळे या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या रिपोर्टमध्ये पूर्वी माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर होती. पण स्वराज्य रक्षक मालिकेने आता या मालिकेला चांगलेच मागे टाकले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. काही आठवड्यांपूर्वी तुझ्यात जीव रंगला ही मालिका अव्वल स्थानावर होती. पण आता टिआरपीच्या रेसमध्ये पहिल्या पाच मालिकांमध्ये देखील या मालिकेचा समावेश नाहीये.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न हा कार्यक्रम तिसऱ्या नंबरवर असून चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान, गिरिश ओक आणि रवी पटवर्धन यांची मुख्य भूमिका असलेल्या अग्गंबाई सासूबाई या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून ही मालिका सुरू झाल्यानंतर काहीच आठवड्यात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे तर नुकतीच सुरू झालेली लग्नाची वाईफ वेडिंगची बायको ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :स्वराज्य रक्षक संभाजीमाझ्या नवऱ्याची बायकोअग्गंबाई सासूबाईचला हवा येऊ द्याझी मराठी