Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > तिशी ओलांडताच भारतीय स्त्री -पुरुष होऊ लागतात जाड, सुटतं पोट - लठ्ठ होण्याची पाहा २ कारणं...

तिशी ओलांडताच भारतीय स्त्री -पुरुष होऊ लागतात जाड, सुटतं पोट - लठ्ठ होण्याची पाहा २ कारणं...

why obesity is increasing in India : why weight not reducing after 30 : Indian lifestyle and obesity causes : भारतीयांमध्ये ३० व्या वर्षानंतर लठ्ठपणा इतक्या वेगाने का वाढत आहे? यामागची नेमकी कारणे आणि उपाय पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2026 18:05 IST2026-03-18T18:00:16+5:302026-03-18T18:05:02+5:30

why obesity is increasing in India : why weight not reducing after 30 : Indian lifestyle and obesity causes : भारतीयांमध्ये ३० व्या वर्षानंतर लठ्ठपणा इतक्या वेगाने का वाढत आहे? यामागची नेमकी कारणे आणि उपाय पाहा...

why obesity is increasing in India why weight not reducing after 30 Indian lifestyle and obesity causes | तिशी ओलांडताच भारतीय स्त्री -पुरुष होऊ लागतात जाड, सुटतं पोट - लठ्ठ होण्याची पाहा २ कारणं...

तिशी ओलांडताच भारतीय स्त्री -पुरुष होऊ लागतात जाड, सुटतं पोट - लठ्ठ होण्याची पाहा २ कारणं...

एकेकाळी 'चांगलं खात्या - पित्या घरचं' म्हणून मिरवणं भूषणासमान मानलं जायचं, पण आज तेच वाढलेलं वजन भारतीयांसाठी चिंतेचा मोठा विषय बनलं आहे. जागतिक स्तरावर भारतीयांची शरीरयष्टी ही इतरांपेक्षा वेगळी मानली जाते, विशेषतः वाढलेलं पोट आणि कंबरेचा घेर ही आपली सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. पण, खरं आव्हान उभं राहतं ते वयाची तिशी ओलांडल्यानंतरच...वयाच्या २० व्या वर्षी जो डाएट किंवा व्यायाम आपल्याला झटपट रिझल्ट द्यायचा, तोच प्रयोग वयाच्या तिशीनंतर कामी येत नाही, असं का होतं? तिशीनंतर चयापचय क्रिया मंदावणे, हार्मोन्सचे बदल आणि बैठी जीवनशैली यांमुळे वजन कमी करण्याचे प्रमाण भारतीयांमध्ये घटताना दिसत आहे. त्यात भर पडते ती जंक फूड आणि चुकीच्या आहाराची...(why weight not reducing after 30).

गेल्या काही वर्षांत भारतामध्ये लठ्ठपणाची समस्या अत्यंत वेगाने वाढत आहे. विशेषतः वयाची तिशी (३० वर्षे) ओलांडल्यानंतर बहुतांश लोकांमध्ये वाढते पोट आणि लठ्ठपणाच्या तक्रारी प्रामुख्याने दिसून येत आहेत. आजच्या काळात लोकांची शारीरिक हालचाल कमालीची कमी झाली आहे. पूर्वी जिथे लोक (Indian lifestyle and obesity causes) रोजची कामे करतानाही खूप चालत-फिरत असत, तिथे आता ऑफिसमध्ये सलग ९-९ तास संगणकासमोर बसून राहावे लागते. अशा प्रकारे दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिल्याने, अन्नातून मिळणारी अतिरिक्त कॅलरी खर्च होत नाही आणि ती शरीरात चरबीच्या स्वरूपात साठू लागते. भारतीयांमध्ये ३० व्या (why obesity is increasing in India) वर्षानंतर लठ्ठपणा इतक्या वेगाने का वाढत आहे? यामागची नेमकी कारणे काय आहेत? याविषयी फोर्टिस हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत बंगा यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय सांगितलं आहे ते पाहूयात... 

वयाची तिशी ओलांडल्यानंतर वजन कमी का होत नाही?

न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत बंगा यांच्या मते, तिसाव्या वर्षांनंतर वजन कमी करणे आव्हानात्मक ठरते, कारण या वयात शरीराची मेटाबॉलिझम (चयापचय क्रिया) प्रक्रिया बऱ्यापैकी मंदावते. याचा अर्थ असा की, शरीर पूर्वीच्या तुलनेत आता खूप कमी कॅलरीज जाळते. जेवणाचे प्रमाण आधीसारखेच असते, परंतु शरीराकडून खर्च होणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण कमी झाल्यामुळे वजन वाढणे स्वाभाविक आहे. याव्यतिरिक्त, तिसाव्या वर्षांनंतर शरीरातील मांसपेशींचे प्रमाण देखील (Muscles) हळूहळू कमी होऊ लागतात, ज्यामुळे शरीराची उर्जेची गरज आणि तिचा वापरही कमी होतो. परिणामी, साठलेली चरबी कमी करणे अधिक कठीण होऊन बसते.

भारतीयांमध्ये तिशीनंतर वजन वाढण्याची मुख्य २ कारणं... 

१. चुकीची आहारपद्धती (Poor Eating Habits) :- डॉ. विनीत बंगा यांच्या मते, गेल्या काही वर्षांत लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये प्रचंड बदल झाला आहे. आजच्या काळात बहुतांश लोक फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स, अति-कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ आणि सॉफ्ट ड्रिंक्स अशा पदार्थांचा आपल्या आहारात फार मोठ्या प्रमाणांत समाविष्ट करतात. या प्रकारच्या आहारामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते, परंतु त्यामानाने पोषक तत्वे मात्र नगण्य असतात. यामुळे शरीरात चरबी वेगाने साठते आणि वजन वाढते. याव्यतिरिक्त, रात्री उशिरा जेवणे आणि जेवणाच्या वेळा निश्चित नसणे, यांमुळे देखील वजन वाढण्याची समस्या गंभीर होत आहे.

डाएट करतानाही बिंधास्त खा पुऱ्या, तमन्न भाटियाचे फिटनेस कोच सांगतात-पुरी खाण्याचं तंत्र...

२. मानसिक ताण आणि झोपेचा अभाव (Stress and Lack of Sleep) :- गेल्या काही वर्षांत भारतीयांमध्ये मानसिक ताण आणि झोपेच्या समस्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विशेषतः शहरांमध्ये राहणारे लोक या समस्येने अधिक त्रस्त आहेत. आजच्या धावपळीच्या युगात कामाचा वाढता दबाव, जास्त 'स्क्रीन टाइम' (मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर) आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बहुतांश लोक आवश्यक तितकी झोप घेऊ शकत नाहीत. याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील हार्मोन्सवर (Hormones) होतो. जेव्हा झोप अपुरी असते आणि ताण वाढतो, तेव्हा शरीरात 'कोर्टिसोल' नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. यामुळे भूक जास्त लागते आणि शरीरात चरबी साठू लागते, ज्याचा अंतिम परिणाम आपल्या वजन वाढण्यावर होतो.

आई झाल्यावर आलिया भटने ३ महिन्यात कमी केलं १६ किलो वजन, तिनं केल्या फक्त ६ गोष्टी-वाचा कोणत्या...

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खास उपाय... 

१. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्या.

२. दररोज नियमित किमान ३० मिनिटे तरी व्यायाम करा.

३. किमान ८ तासांची पुरेशी झोप घ्या.

४. हेल्दी लाइफस्टाइल रूटीन फॉलो करा.

५. आयुष्यात छोटे-छोटे बदल करा, जसे की जंक फूड कमी प्रमाणांत खा.

६. ठराविक वेळेला जेवण करा; एकाच वेळेवर जेवल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

७. दररोज ३० ते ४० मिनिटे चालण्याची (वॉक) सवय लावा.

Web Title : 30 के बाद वजन बढ़ना: भारतीयों में आहार, तनाव प्रमुख कारण।

Web Summary : 30 के बाद भारतीयों का वजन मेटाबॉलिज्म धीमा होने, गलत आहार और निष्क्रिय जीवनशैली के कारण बढ़ता है। तनाव और नींद की कमी समस्या को बढ़ाती है। संतुलित आहार, व्यायाम और नियमित नींद वजन नियंत्रण के लिए आवश्यक हैं।

Web Title : Weight gain after 30: Indians prone due to diet, stress.

Web Summary : After 30, Indians gain weight due to slower metabolism, poor diet, and sedentary lifestyles. Stress and lack of sleep worsen the issue. Balanced diet, exercise, and regular sleep are key to control weight.