Join us

PCOD त्रासामुळे वेगानं वजन वाढलं? समजून घ्या ५ कारणं, पाहा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:29 IST

PCOD Weight Gain Causes: पीसीओडी असलेल्या महिलांचं वजन वेगानं वाढतं. पण यामागची कारणं त्यांना माहीत नसतात. हीच कारणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

PCOD Weight Gain Causes: पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम) हा एक हार्मोनल आजार आहे. महिलांमध्ये हा आजार रिप्रोडक्टिव इयर्स दरम्यान होतो. पीसीओडी असलेल्या महिलांमध्ये इन्सुलिन रेजिस्टेन्स, हार्मोनल असंतुलन आणि सूजसहीत अनेक मेटाबॉलिकसंबंधी समस्या होतात. पीसीओडी असलेल्या महिलांचं वजन वेगानं वाढतं. पण यामागची कारणं त्यांना माहीत नसतात. हीच कारणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पीसीओडीमध्ये वजन वाढण्याची मुख्य कारणं

१) इन्सुलिन रेजिस्टेन्स

पीसीओडी असलेल्या महिलांमध्ये इन्सुलिन रेजिस्टेन्स होतं, याचा अर्थ असा की, त्यांच्या शरीरातील कोशिका इन्सुलिन प्रति योग्यपणे प्रतिक्रिया देत नाही. इन्सुलिन एक हार्मोन आहे जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतं. जेव्हा इन्सुलिन रेजिस्टेन्स होतं, तेव्हा शरीराला ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी जास्त इन्सुलिन बनवावं लागतं. एक्स्ट्रा इन्सुलिनमुळे वजन वाढू शकतं.

२) हार्मोनल असंतुलन

पीसीओडीमध्ये अनेक हार्मोन्समध्ये असंतुलन होतं, ज्यात एण्ड्रोजन (पुरुष हार्मोन) ची लेव्हल वाढणं याचाही समावेश आहे. एण्ड्रोजन वजन वाढणं, खासकरून पोटाच्या आजूबाजूला फॅट जमा होण्याला कारणीभूत ठरतं.

३) सूज

पीसीओडी असलेल्या महिलांमध्ये नेहमीच सूज वाढलेली असते. सूज वजन वाढणं आणि लठ्ठपणाशी संबंधित आहे.

४) भूक वाढणं

पीसीओडी असलेल्या महिलांना भूक वाढण्याचा अनुभव होऊ शकतो. अशात त्या अधिक खातात आणि त्यामुळे त्याचं वजन वाढतं.

५) तणाव

तणावामुळे वजन वाढतं. पीसीओडी असलेल्या महिलांमध्ये तणाव जास्त असतो, ज्यामुळे त्यांचं वजन अधिक वेगानं वाढतं.

पीसीओडीमध्ये वजन वाढल्यास 'या' आजारांचा धोका

हार्ट डिजीज

डायबिटीस

हाय ब्लड प्रेशर

स्ट्रोक

काही प्रकारचे कॅन्सर

वजन कसं कंट्रोल कराल?

पीसीओडी असलेल्या महिलांसाठी हेल्दी वेट कायम ठेवणं गरजेचं असतं. वजन कमी करणं किंवा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये काही बदल करण्याची गरज असते. यासाठी हेल्दी डाएट, नियमितपणे एक्सरसाईज, स्ट्रेस मॅनेजमेंट, पुरेशी झोप या गोष्टी महत्वाच्या ठरतात.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सपीसीओडी