Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > अगं लग्नानंतर किती सुटली आहेस!’ मुलींना बसतात टोमणे, लग्नानंतर मुलीचं वजन वाढण्याची ५ कारणं

अगं लग्नानंतर किती सुटली आहेस!’ मुलींना बसतात टोमणे, लग्नानंतर मुलीचं वजन वाढण्याची ५ कारणं

Why Do Ladies Put On Weight After Marriage : या सगळ्यात स्वत:कडे दुर्लक्ष झाल्यानं किंवा खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यानं मुलीचं वजन वाढत जातं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 18:38 IST2025-09-11T18:33:04+5:302025-09-11T18:38:47+5:30

Why Do Ladies Put On Weight After Marriage : या सगळ्यात स्वत:कडे दुर्लक्ष झाल्यानं किंवा खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यानं मुलीचं वजन वाढत जातं.

Why Do Indian Women Put On Weight After Marriage : 5 Reasons Ladies Put On Weight After Marriage | अगं लग्नानंतर किती सुटली आहेस!’ मुलींना बसतात टोमणे, लग्नानंतर मुलीचं वजन वाढण्याची ५ कारणं

अगं लग्नानंतर किती सुटली आहेस!’ मुलींना बसतात टोमणे, लग्नानंतर मुलीचं वजन वाढण्याची ५ कारणं

'अगं लग्नानंतर किती जाड  झालीस, लग्न मानवलं वाटतं.... असे  डायलॉग सहजच लग्न झालेल्या मुलींना ऐकावे लागतात. लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात वेगवेगळे बदल होत असतात. एका घरातून दुसऱ्या घरात जाणं, तिथल्या सवयी, माणसं सगळ्या गोष्टी हळूहळू समजून घेत त्यांच्यात ॲडजस्ट बराचवेळ जातो (Ladies Put On Weight After Marriage). या सगळ्यात स्वत:कडे दुर्लक्ष झाल्यानं किंवा खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यानं मुलीचं वजन वाढत जातं. पण हा बदल नेमका कशामुळे होतो. वजन वाढण्यासाठी खरंच काही गोष्टी कारणीभूत आहेत का पाहूया. (Why Do Indian Women Put On Weight After Marriage)

१) झोपेची कमतरता

लग्न झाल्यानंतर वाढत्या जबाबदाऱ्या आणि बदललेली दीनचर्या यामुळे पुरेशी झोप मिळत नाही आणि थकव्यामुळे शरीरात अधिकचे फॅट साठू लागतं आणि वजनही वाढतं.

२) अनियमित आहार

सगळ्यासोबत खाणं, खाण्याच्या वेळा चुकणं, अनियमित वेळेत खाणं, जास्त प्रमाणात खाणं यामुळे वजन वाढतं.

३) गोड पदार्थ, स्नॅक्स जास्त प्रमाणात खाणं
 
लग्नसमारंभ, सण-उत्सव, नातेवाईकांच्या भेटीगाठी यामुळे गोड पदार्थ, तेलकट, तुपकट सतत खाण्यात येतं. ज्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते आणि वजन वाढत जातं.

४) हॉर्मोनल बदल
 
लग्नानंतर अनेक मुलींमध्ये हॉर्मोनल बदल होतात ज्यामुळे वजन वाढण्याची गती वाढते. अनियमित पाळी, पीसिओएस, अंगात रक्त कमी असणं अशा अनेक कारणांमुळे हॉर्मोन्सचे कार्य व्यवस्थित होत नाही परीणामी वजन वाढते. यावर उपाय म्हणून जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा नियमित ठेवा. शारीरिक हालचालही महत्वाची असते.

चहात आधी काय घालावं-दूध,साखर की चहा पावडर? पाहा टपरीस्टाईल कडक चहा करण्याची पद्धत

५) व्यायामाचा अभाव

लग्नाआधी जिम योगा किंवा चालण्याची सवय असते पण लग्नानंतर हळूहळू ही सवय कमी होते किंवा काहीजणांचा व्यायाम पूर्णपणे बंद होतो. म्हणून वजन वाढतं. यावर उपाय म्हणून घरच्याघरी दोरी उड्या, जपिंग जॅक यांसारखे सोपे व्यायाम करा.

या सर्व कारणांव्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्य तुमच्या चांगल्या शारीरिक आरोग्यासाठी फार महत्वाचे असते. लग्नानंतर अनेक कारणांमुळे मानसिक ताण येतो. नव्या घरातील जबाबदाऱ्या, नातेसंबंध सांभाळण्याचा ताण  शरीरातील कॉर्टिसोल हॉर्मोन वाढवतो ज्यामुळे पोटाभोवती चरबी जमा होते.

Web Title: Why Do Indian Women Put On Weight After Marriage : 5 Reasons Ladies Put On Weight After Marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.