Join us

रोज तासंतास चालूनही सुटलेलं पोट का कमी होत नाही? पाहा कारणं आणि पोट कमी करणारे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 10:02 IST

Belly Fat Causes : भरपूर लोक रोज न विसरता बराच वेळ वॉक करतात तरी सुद्धा त्यांचं पोट फुग्यासारखं फुगलेलं आणि बाहेर दिसतं. कारण...

Belly Fat Causes : जास्तीत जास्त लोकांना हेच वाटत असतं की,  ते फिट दिसावेत आणि सडपातळही दिसावेत. पण अनेकदा एकतर पूर्ण शरीर गोलमटोल दिसतं नाही तर मग फक्त तरी बाहेर आलेलं असतं. बरं भरपूर लोक रोज न विसरता बराच वेळ वॉक करतात तरी सुद्धा त्यांचं पोट फुग्यासारखं फुगलेलं आणि बाहेर दिसतं. अशात याचं कारण समजत नाही. याबाबतच कार्डियोलॉजिस्ट डॉ. आलोक चोप्रा यांनी काही मुद्दे सांगितले आहेत. 

पोटावर चरबी वाढण्याची कारणं

चुकीचा आहार

बरेच लोक सकाळच्या नाश्त्यात ब्रेड, दुपारच्या जेवणात भात आणि रात्री चपाती व कधी कधी जंक फूड जसे की, समोसे वगैरे खातात. ज्यामुळे शरीराला जास्त कार्ब्स मिळतात. यामुळेच पोटावरील चरबी वाढते.

स्ट्रेस आणि इमोशनल ईटिंग

कामाचे वाढलेले तास, वाढलेलं कामाचं टेंशन आणि झोपेची कमतरता ही सुद्धा पोटावरील चरबी वाढण्याची मुख्य कारणं आहेत. एकाच जागी बसून जास्त वेळ काम केल्यास पोट बाहेर येण्याची शक्यता अधिक असते.

हालचाल कमी

डॉक्टर म्हणाले की, लोक पुरेसा व्यायाम करत नाही आणि वॉक करतही असतील तर हळूहळू करतात. ज्याचा शरीरावर फार काही जास्त प्रभाव पडत नाही. लोक अनेक वर्ष वॉक करतात, पण तरीही त्यांचं पोट बाहेर निघालेलं दिसतं. जर आपल्याला वाटत असेल की, पोट आत जावं तर किमान 40 मिनिटं वेगानं वॉक करा. हात हलवत वॉ करता. यानं चरबी लवकर कमी होईल.

खराब क्वालिटीचे फूड

आहारात फार जास्त प्रोसेस्ड फूडचा समावेश करणं फार चुकीचं आहे. आहारातून फायबर मिळायला हवं. खूप जास्त दूध, दही किंवा पनीरनंही अधिक फायदा मिळत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त पोषक तत्व असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करावा.

जेनेटिक्स 

अनेकदा व्यक्तीची शरीरच अशा प्रकारच असतं की, त्याचं पोट बाहेर निघणं सुरू होतं. अनेकदा ही समस्या जेनेटिकही असते. पण यावर मेहनत घेतल्यास समस्या दूर होऊ शकते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स