Belly Fat Cause : आजकाल चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी वाढणं खूप खूपच कॉमन झालं आहे. एकदा का पोटावरील चरबी वाढली तर ती कमी करणं फारच अवघड असतं. खासकरून वयाच्या तिशीनंतर. या वयात बेली फॅट कमी करणं आधीच्य तुलनेत जास्त अवघड वाटू लागतं. डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सांगितलं की, का डाएट आणि लाइफस्टाईलमध्ये कोणताही बदल न करता ३० वयानंतर पोटावरील चरबी वाढू लागते. डॉ. सेठी म्हणाले की, आधी जो आहार नुकसान करत नव्हता, तोच आता पोटावरील चरबी वाढण्याचं कारण ठरत आहे. आधीसारखाच एक्सरसाईज करूनही काही फरक दिसत नाही.
डॉ. सेठी सांगतात की, हा बदल शरीरात अचानक होत नाही, तर वाढत्या वयासोबत शरीरात होणाऱ्या काही नॅचरल बदलांमुळे होतो.
मसल्स कमी होणं
डॉक्टरांनुसार ३० वयानंतर दर दहा वर्षांनी शरीरातील मसल्स ३ ते ८ टक्के कमी होऊ लागतात. जेव्हा शरीरात मसल्स असतात तेव्हा शरीर आराम करतानाही कॅलरी बर्न करत असतं. वाढत्या वयात मसल्स कमी झाल्याने फॅट बर्न होणंही कमी होतं. याचं कारण हे आहे की, शरीरात ग्लूकोजचा वापर करण्याचं जवळपास ७० ते ८० टक्के काम मसल्स करतात. डॉ. सेठी सांगतात की, जेव्हा मसल्स मांस कमी होतं तेव्हा शुगर जास्त वेळ रक्तात राहते आणि बेली फॅटच्या रूपात जमा होऊ लागते.
इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होणं
वाढत्या वयासोबत शरीराची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुद्धा ४ ते ५ टक्के कमी होऊ लागते. याचा अर्थ असा की, आधी जेवढ्या प्रमाणात कार्ब्स खाऊन काही समस्या होत नव्हती, तेच प्रमाण आता ब्लड शुगर वेगाने वाढवतं. यामुळे फॅट जास्त वेगाने वाढू लागतं. खासकरून पोट आणि कंबरेच्या आजूबाजूला.
हार्मोन्समध्ये बदल
वयाच्या तिशीनंतर शरीरातील हार्मोन्समध्येही बदल बघायला मिळतात. ह्यूमन ग्रोथ हार्मोन, टेस्टोस्टेरोन आणि एस्ट्रोजनसारख्या हार्मोन्सचं प्रमाण कमी होऊ लागतं. तर स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलचं प्रमाण वाढू लागतं. या बदलामुळे पोटाच्या आता खोलवर फॅट जमा होण्याचं प्रमाण वाढतं. या सगळ्या कारणांमुळे जास्तीत जास्त लोकांच्या पोटावर ३० वयानंतर चरबी जमा होऊ लागते.
बेली फॅट कमी करण्याचे उपाय
प्रोटीनयु्क्त आहार घ्या
आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा
इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी रोज वॉक करा, अॅक्टिव रहा
रोज ७ ते ८ तासांची चांगली झोप घ्या
