बीटरुट आरोग्यदायी आहे हे आपल्याला माहितीच आहे. ज्या लोकांचं हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं अशा लोकांना नेहमीच बीटरुट खाण्याचा सल्ला दिला जातो. बीटरुटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, विटामिन बी १, २ आणि सी, लोह आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी, महिलांमध्ये मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी शिवाय बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही बीटरुट उपयुक्त ठरते. पण बीटरुट खाण्याचे एवढे सगळे फायदे असले तरी ते प्रत्येकाच्या तब्येतीला मानवतेच असे नाही. त्यामुळे बीटरुट खाताना थोडी काळजी घ्यायला हवी आणि काही लोकांनी तर बीटरुट खाणं पुर्णपणे टाळायलाच हवं (who should avoid eating beetroot?) असं एक्सपर्ट सांगतात.(avoid 2 mistakes while eating beetroot)
बीटरुट खाताना कोणती काळजी घ्यावी?
आपल्याला माहितीच आहे की बीटरुट हे एक कंदमूळ आहे. त्यामुळे ते अनेकांना पचतच असं नाही. ज्या लोकांना नेहमीच पचनाचा त्रास होतो त्यांनी सलाड, कोशिंबीर, ज्यूस अशा पदार्थांद्वारे कच्चं बीटरुट खाणं टाळायला हवं.
फक्त काही मिनिटं 'या' पद्धतीने तळपाय पाण्यात बुडवा- स्ट्रेस, थकवा जाऊन मिळतील ३ जबरदस्त फायदे
बीट शिजवून खाणं जास्त योग्य. शिवाय बीटरुट हे एक मूळ असल्याने त्याच्यावर पेस्टीसाईड्स, केमिकल्स फवारलेले असू शकतात. त्यामुळे ते खाण्यापुर्वी २- ३ वेळा अगदी स्वच्छ धुवून घ्यावं आणि मगच खावं.
बीटरुटमध्ये ऑक्झालेट जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे ज्यांना किडनी स्टोनचा त्रास असतो, अशा लोकांनी बीटरुट खाणं टाळायला हवं. कारण बीटरुट खाल्ल्याने त्यांचा त्रास वाढण्याची शक्यता असते.
वजन वाढण्याचं टेन्शन येतंय? जेवण झाल्यानंतर करा ५ याेगासनं- अपचनाचा त्रासही होणार नाही
आयबीएस irritable bowel syndrome किंवा आयबीडी Inflammatory Bowel Disease असा त्रास असणाऱ्या लोकांनीही कच्चं बीटरुट खाणं टाळायला हवं. कारण बीटरुटमध्ये असणारे काही घटक गॅसेस, ब्लोटिंगसारखे त्रास वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. बीटरुट खाण्याचा सगळ्यात योग्य मार्ग म्हणजे ते स्वच्छ धुवून घ्या. त्याची सालं काढून टाका आणि नंतर ते शिजवून त्याचं सूप करा. जिरेपूड, काळं मीठ, थोडंसं तूप घालून केलेले सूप पचायलाही हलकं असतं.
Web Summary : Beetroot is nutritious, but some should avoid it. Those with digestive issues, kidney stones, or IBS should limit or avoid beetroot. It's best consumed cooked and well-washed to avoid potential issues.
Web Summary : चुकंदर पौष्टिक है, लेकिन कुछ लोगों को इससे बचना चाहिए। पाचन संबंधी समस्याओं, गुर्दे की पथरी या आईबीएस वाले लोगों को चुकंदर सीमित या परहेज करना चाहिए। संभावित समस्याओं से बचने के लिए इसे पकाना और अच्छी तरह धोना सबसे अच्छा है।