Join us
Daily Top 2Weekly Top 5

बारीक व्हायचंय-जिभेवर ताबाच नाही? दिवसभरात 'या' वेळेला ब्लॅक कॉफी प्या, झरझर घटेल चरबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 16:39 IST

Which Time Is Best For Black Coffee For Fat Loss : व्यस्त जीवनशैलीत अशक्तपणा, थकवा, एंजायटी, टेंशन, सुस्ती येणं अशा समस्या येणं खूपच कॉमन आहे.

जगभरातील लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चहा किंवा कॉफी पितात. बऱ्याच लोकांना दुधाचा चहा प्यायला आवडतो तर काहीजण कॉफी पिणं पसंत करतात. चहा आणि  कॉफी पिण्याचं प्रमाण हळूहळू वाढत आहे. मिल्क कॉफी, हे. मिल्क टी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफीच्या तुलनेत जास्त प्रमाणात प्यायली जाते. ब्लॅक कॉफी प्यायल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. (Which Time Is Best For Black Coffee For Fat Loss)

व्यस्त जीवनशैलीत अशक्तपणा, थकवा, एंजायटी, टेंशन, सुस्ती येणं अशा समस्या येणं खूपच कॉमन आहे. अशा समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ब्लॅक कॉफी पिऊ शकता. कॉफीमध्ये कॅफेन असते. जे नर्वस सिस्टिमला जास्त उत्साहीत करते. ही कॉफी घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा. (Right Way To Consume Black Coffee)

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

ज्या लोकांना लठ्ठपणा किंवा वाढत्या वजनाची समस्या आहे त्यांनी नियमित कॉफीचे सेवन करायला हवे. यातील कॅफेनमुळे शरीरातील फॅट्स वेगानं कमी होता. खाल्लेल्या अन्नाचं पचनही व्यवस्थित होते.

 डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर

 एका अभ्यासानुसासर ब्लॅक कॉफीमध्ये डायबिटीसचा धोका कमी करणारे काही गुण असतात. जी व्यक्ती ब्लॅक कॉफीचे सेवन करते. त्यांच्या शरीरात इंसुलिनतचं उत्पादनं होतं. ज्यामुळे रक्तात साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

ब्लॅक कॉफी कधी पितात?

तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी, दुपारी ब्लॅक कॉफी घेऊ शकता. पण १ ते २ कपपेक्षा जास्त घेऊ नका. जर तुम्ही ब्लॅक कॉफी जास्त प्रमाणात घेतली तर शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. म्हणून कॉफी पिण्याची योग्य वेळ माहित असायला हवी. 

ब्लॅक कॉफी सकाळी प्यायला हवी.  पण सकाळी उठल्यानंतर थेट कॉफी पिऊ नका. उठल्यानंतर ९० मिनिटांनंतर ही कॉफी प्यावी. जर तुम्ही वर्कआऊट करत असाल तर त्या आधी ब्लॅक कॉफी पिऊ शकता. रिसर्चनुसार एका व्यक्तीनं दिवसभरात  ३ कपपेक्षा जास्त ब्लॅक कॉफी पिऊ नये. कारण अधिक प्रमाणात कॅफेन घेतल्यास शरीराचं  नुकसान होऊ शकतं.  (Ref)

या कॉफीत एक हजार केमिकल कम्पाऊंड्स असतात. यात कॅफेन, पॉलिफेनल्स आणि टॅनिन्स यांसारखे काही केमिकल कम्पाऊंड असतात जे शरीरातील पोषक तत्व शोषून घेण्यात बाधा आणतात. म्हणून जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यानं शरीराचं नुकसान होऊ शकतं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Black coffee for weight loss: Best time to drink it.

Web Summary : Black coffee aids weight loss, benefits diabetics by controlling blood sugar. Drink 1-2 cups daily, ideally 90 minutes after waking or before workouts. Limit intake to avoid adverse effects.
टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स