Join us

सकाळी झोपेतून उठल्यावर वजन करावं की रात्री झोपताना? पाहा वजनकाट्यावर उभं राहण्याची योग्य वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 16:12 IST

Weight Loss Tips : सतत जर वजन चेक करत असाल तर यानं आपला आत्मविश्वास कमी होतो आणि वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण होतो.

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी आजकाल लोक अनेक गोष्टींचा आधार घेतात. कुणी डायटिंग करतं, तर कुणी डायटिंगसोबत व्यायाम करतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणारे लोक आणखी एक काम आवर्जून करतात ते म्हणजे सतत वजन किती झालं हे चेक करणं. पण असं करणं चुकीचं असतं. जर आपण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर वजन कधी चेक करायचं हे महत्वाचं ठरतं. 

बरेच लोक सतत वजन किती कमी झालं किती नाही हे चेक करत असतात.  वर्कआउटनंतर वजन कमी झालं की नाही हे चेक करतात. पण हे बरोबर नाही. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर वजन कधी चेक करून नये हे जास्त महत्वाचं आहे. 

सतत जर वजन चेक करत असाल तर यानं आपला आत्मविश्वास कमी होतो आणि वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपण बघुया की, दिवसभरात अशी कोणती वेळ असते जेव्हा आपण वजन चेक करू नये.

पाणी प्यायल्यावर

जर आपण सकाळी एकाच वेळी भरपूर पाणी प्यायलं असेल तर वजन करणं टाळलं पाहिजे. पाण्यात फॅट नसतं, पण याचा संबंध वजनाशी असतो. पाणी जास्त प्याल तर वजन जास्त दिसेल.

जेवण केल्यावर

अर्थात जेवण केल्यावर वजन चेक कराल तर जास्तच दिसेल. त्याशिवाय जेव्हा आपण प्रोसेस्ड फूड खाता तेव्हाही वजन वाढलेलं दिसू शकतं. कारण प्रोसेस्ड फूड शरीरात पाणी रोखण्याचं काम करतात. 

सकाळी झोपेतून उठल्यावर

सकाळी झोपेतून उठल्यावर वजन चेक करणं टाळलं पाहिजे. खासकरून बाथरूमला गेले नसाल तेव्हा. असं केल्यास आपल्याला वजनाचा आकडा चुकीचा दिसू शकतो. रात्रभर पोटात जमा झालेल्या वेस्टमुळे वजन वाढलेलं दिसू शकतं.

मासिक पाळीदरम्यान

महिलांनी मासिक पाळीदरम्यान वजन चेक करणं चुकीचं ठरेल. कारण हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि पाण्याच्या रिटेंशनमुळे महिलांचं वजन अधिक वाढतं.

व्यायाम केल्यावर लगेच

काही लोकांना सवय असते की, जिममध्ये किंवा घरी व्यायाम केल्यावर वजन चेक करतात. पण ही पद्धतही चुकीची आहे. कारण व्यायाम करताना बराच घाम जातो आणि शरीर डिहायड्रेट होतं. अशात रीडिंग चुकीचं येऊ शकतं.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स