भारतीय जेवणात चपाती, भाजी, वरण, भात हे पदार्थ रोजच्या जेवणात असतात. पण वजन कमी करण्यासाठी तर काहीजण फिट राहण्यासाठी डाएट करताना रोजच्या खाण्यातील हे पदार्थ खाणं टाळतात. काहीजण भात खाणं टाळतात तर काहीजण चपाती खात नाहीत. ग्लुटेन फ्री पर्याय म्हणून बरेच लोक चपाती खाणं टाळून भाकरी खातात किंवा गहू, मैद्याचे कोणतेही पदार्थ खात नाहीत. १ महिन्यासाठी जर तुम्ही चपाती खाल्ली नाही तर शरीरात कोणते बदल दिसून येतील समजून घेऊ. (What Happens If You Don't Eat Wheat Chapati For 30 Days Find Out Here)
१ महिना चपाती खाल्ली नाही तर शरीरात काय बदल होतील? (What Happens If You Don't Eat Wheat Chapati For 30 Days)
चपाती खासकरून गव्हापासून बनवली जाणारी चपाती ही कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्त्रोत आहे. जेव्हा तुम्ही ३० दिवस चपाती खात नाही आणि त्याऐवजी तांदूळ किंवा जंक फूडही खात नाही जेव्हा शरीराचा कार्ब्स इन्टेक कमी होतो ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. आहारात प्रोटीन्स आणि फायबर्सयुक्त पदार्थांचा समावेश जास्तीत जास्त करा. याशिवाय जर तुम्ही महिनाभर चपाती खाल्ली नाही तर शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण तुम्ही सिंपल् कार्ब्स कमी खाता. ज्या लोकांना डायबिटीसची समस्या आहे त्यांच्यासाठी हे उत्तम ठरते.
सुरूवातीला तुम्हाला थकवा, कमकुवतपणा जाणवू शकतो. कारण शरीरात तुम्ही कार्ब्स कमी प्रमाणात घेत आहात पण एनर्जीसाठी शरीरातील फॅट वापरण्यास सुरूवात होते.
जर तुम्ही ग्लुटेन सेंसिटिव्ह असाल तर चपाती खाणं सोडल्यानं तुमची पचनशक्ती सुधारू शकते. ज्यामुळे पोट फुगणं, गॅस, एसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आणि आतडेही चांगले राहण्यास मदत होते.
चपातीऐवजी काय खावे? (What To Eat Instead Of Chapati)
वजन कमी करण्यासाठी फक्त चपाती सोडून चालत नाही तर तुम्हाला मैदा तसंच इतर अन्हेल्दी पदार्थ चिप्स, बिस्किट्स किंवा भात खाणं टाळायला हवं. त्याऐवजी आहारात भाज्या, डाळी, दही, टोफू, मल्टीग्रेन चपाती,नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, ताज्या हिरव्या पालेभाज्या, फळं या पदार्थांचा समावेश करा. जर तुम्ही चपाती खाणारच असाल तर त्यात नाचणीचे किंवा ज्वारीचे पीठ मिसळा.
Web Summary : Skipping chapati for a month may aid weight loss by reducing carb intake and stabilizing sugar levels. Initial fatigue may occur as the body adapts, but digestion could improve, especially for those gluten-sensitive. Opt for millets, vegetables, and protein-rich foods instead.
Web Summary : एक महीने तक चपाती छोड़ने से कार्ब का सेवन कम होने और शर्करा का स्तर स्थिर होने से वजन घटाने में मदद मिल सकती है। शरीर के अनुकूल होने पर शुरुआती थकान हो सकती है, लेकिन पाचन में सुधार हो सकता है, खासकर ग्लूटेन के प्रति संवेदनशील लोगों के लिए। इसके बजाय बाजरा, सब्जियां और प्रोटीन युक्त खाद्य पदार्थों का विकल्प चुनें।