Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > १५ दिवस गोड खाणं बंद केलं तर काय होईल? साखर सोडण्याचे काय परिणाम होतात, पाहा

१५ दिवस गोड खाणं बंद केलं तर काय होईल? साखर सोडण्याचे काय परिणाम होतात, पाहा

How To Control Sugar Cravings : जर तुम्ही १५ दिवस गोड  खाणं सोडलं तर शरीरात बरेच बदल दिसतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:17 IST2026-04-08T12:59:12+5:302026-04-08T13:17:32+5:30

How To Control Sugar Cravings : जर तुम्ही १५ दिवस गोड  खाणं सोडलं तर शरीरात बरेच बदल दिसतील.

What Effects Does Abstaining From Sweets For 15 Days Know Benefits And Side Effects | १५ दिवस गोड खाणं बंद केलं तर काय होईल? साखर सोडण्याचे काय परिणाम होतात, पाहा

१५ दिवस गोड खाणं बंद केलं तर काय होईल? साखर सोडण्याचे काय परिणाम होतात, पाहा

भारतीय जेवणात गोड पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. लग्न, बर्थ डे पार्टी किंवा साखरपूडा असो कोणत्याही बहाण्यानं लोक गोड खातात. याचा अर्थ असा की कोणत्याही पदार्थाला गोडवा येण्यासाठी त्यात साखर, गूळ हे पदार्थ हमखास घातले जातात (How To Control Sugar Cravings). गोड खाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे भारतील सर्वाधिक लोकांना डायबिटीस, हाय ब्लड शुगर असे आजार उद्भवत आहेत. जर तुम्ही १५ दिवस गोड  खाणं सोडलं तर शरीरात बरेच बदल दिसतील. १५ दिवस गोड खाल्ल्यानं शरीरावर काय परिणाम होतो समजून घेऊ. (What Happen When You Stop Eating Sugar For 15 Days)

१५ दिवस साखर खाल्ल्यानं शरीरावर काय परिणाम होतो

जर तुम्ही गोड खाण्याचे शौकीन असाल आणि  १५ दिवसांसाठी साखर खाणं पूर्णपणे  सोडलं तर शरीरात काही बदल दिसून येतील. तुम्हाला शुगर क्रेव्हींग्स जास्त होतील पण साखर सोडल्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल. पण पूर्णपणे साखर सोडणं तुमच्यासाठी कठीण होऊ शकतं म्हणून फळं,सुका मेवा हे पदार्थ खाऊ शकता. आर्टिफिशियल साखर खाणं पूर्णपणे बंद करा.

जर तुम्ही आजपासून व्यायाम करायला सुरूवात केली तर काय होईल? शरीर कसं दिसेल, पाहा

१५ दिवस गोड न खाण्याचे फायदे

 हेल्थ एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार १५ दिवस गोड न खाल्ल्यामुळे शरीरात बरेच सकारात्मक बदल दिसून येतील. जर तुम्ही २ आठवडे गोड खाल्ले  नाही तर शुगल लेव्हल स्टेबल राहील. इंसुलिन सेंसिटिव्हीटी चांगली होईल तसंच वजन कमी करण्यावरही याचा परिणाम दिसून येईल. तसंच एक्स्ट्रा कॅलरी इंटेक कमी होईल. पिंपल्स, डलनेस कमी होण्यास मदत होईल.

वाढलेलं युरिक ॲसिड कमी करण्यासाठी ७ उपाय, सूज-ठणकही होईल कमी

गोड कमी खाल्ल्यानं झोप चांगली येते आणि मूड चांगला राहण्यास मदत होते. अचानक शरीरात होणारा डोपामाईन स्पाईक कमी होते. तसंच शुगर कमी झाल्यामुळे वजनही काही प्रमाणात कमी होईल तसंच चेहऱ्याची सूज कमी होईल चेहरा स्लिम दिसेल.

शुगर क्रेव्हींग्स कंट्रोल होतात

शुगर क्रेव्हिंग्स तुमचा मूड खराब करू शकतात. हे टाळण्यासाठी तुम्ही नॅच्युरल स्वीटनरर्ससारखी फळं किंवा सुका मेवा खाऊ शकता. जर गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही खजूर खाऊ शकता.  जास्त गोडव्यासाठी तुम्ही आंबा, केळी, गोड फळं खाऊ शकता किंवा डार्क चॉकलेटसुद्धा खाऊ शकता.

Web Title : 15 दिन चीनी खाना बंद करने से क्या होता है?

Web Summary : 15 दिनों तक चीनी छोड़ने से स्थिर रक्त शर्करा, बेहतर इंसुलिन संवेदनशीलता और वजन घटाने सहित महत्वपूर्ण स्वास्थ्य लाभ हो सकते हैं। यह चीनी की लालसा को नियंत्रित करने, मुंहासों को कम करने, नींद में सुधार करने और मूड को बेहतर बनाने में मदद करता है। फल और खजूर जैसे प्राकृतिक स्वीटनर लालसा को प्रबंधित करने में मदद कर सकते हैं।

Web Title : What Happens When You Stop Eating Sugar for 15 Days?

Web Summary : Giving up sugar for 15 days can lead to significant health benefits, including stable blood sugar, improved insulin sensitivity, and weight loss. It helps control sugar cravings, reduces acne, improves sleep, and enhances mood. Natural sweeteners like fruits and dates can help manage cravings.