Weight Loss Food : बऱ्याच महिला किंवा पुरूष वाढलेल्या वजनामुळे चिंतेत आहेत. ते वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. पण तरीही त्यांचं वजन काही कमी होत नाही. कारण वजन कमी करण्याच्या प्रोसेस दरम्यानही लोक अशा काही गोष्टी खातात, ज्या वजन कमी करण्यात अडथळा निर्माण करतात. अशात अलिकडे एका रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, काय खाणं कमी केलं तर वजन कमी करण्यास यश मिळू शकतं.
अलिकडेच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जर आपण प्रोसेस्ड फूड कमी आणि जास्त नॅचरल गोष्टी खातो तेव्हा स्वत:ला फिट ठेवणं सोपं होतं.
प्रोसेस्ड फूड सोडा, वजन कमी करा
यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) च्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, त्यांनी दोन प्रकारच्या डाएट ठरवल्या. पहिली मिनिमली प्रोसेस्ड आणि दुसरी अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड. दोन्ही डाएटमध्ये पोषणाची काळजी घेण्यात आली होती. नेचर मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमधून समोर आलं की, ज्या लोकांनी कमी प्रोसेस्ड म्हणजे मिनिमल प्रोसेस्ड अन्न खाल्लं, त्यांचं वजन अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाणाऱ्यांच्या तुलनेत दुप्पट कमी झालं.
यूसीएल सेंटर फॉर ओबेसिटी रिसर्चचे लेखक डॉ. सैमुअल डिकेन म्हणाले की, "या रिसर्चचा मुख्य उद्देश हा होता की, डाएटनं वजनावर काय प्रभाव पडतो. दोन्ही डाएट करून लोकांनी वजन कमी केलं. पण ज्या लोकांनी कमी प्रोसेस्ड फूड खाल्लेत, त्यांचं वजन जवळपास दुप्पट कमी झालं होतं".
या रिसर्चमध्ये ५५ वयस्कांना दोन गटात विभागण्यात आलं होतं. एका ग्रुपनं आठ आठवडे एमपीएफ डाएट घेतली जसे की, ओट्स, घरी बनवलेली स्पेगेटी बोलोनेज इत्यादी. तर दुसऱ्या ग्रुपनं यूपीएफ डाएट घेतली.
दोन्ही ग्रुपचं आठ आठवड्यानंतर विश्लेषण करण्यात आलं तेव्हा दोन्ही ग्रुपनी वजन कमी केल्याचं दिसलं. पण एमपीएफ डाएटनं जवळपास २.०६ टक्के वजन कमी झालं, तर यूपीएफ डाएटनं जवळपास १.०५ टक्के वजन कमी झालं. कमी प्रोसेस्ड फूड खाणाऱ्यांचा फायदा अधिक झाला.