Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वाह मानलं! ८७ वर्षांच्या आजींनी ६३ किलो वजन घटवलं; वेट लॉसची १ सिक्रेट ट्रिक, पाहा व्हिडिओ

वाह मानलं! ८७ वर्षांच्या आजींनी ६३ किलो वजन घटवलं; वेट लॉसची १ सिक्रेट ट्रिक, पाहा व्हिडिओ

Weight Loss Journey 87 Year Old Shakuntala Devi : जर आपण मनापासून ठरवलं तर कोणतीही गोष्ट वयाच्या कोणत्याही टप्प्यावर साध्य करू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 20:21 IST2025-09-22T20:14:46+5:302025-09-22T20:21:57+5:30

Weight Loss Journey 87 Year Old Shakuntala Devi : जर आपण मनापासून ठरवलं तर कोणतीही गोष्ट वयाच्या कोणत्याही टप्प्यावर साध्य करू शकतो.

Weight Loss Journey 87 Year Old Shakuntala Devi Yoga Transformation Journey | वाह मानलं! ८७ वर्षांच्या आजींनी ६३ किलो वजन घटवलं; वेट लॉसची १ सिक्रेट ट्रिक, पाहा व्हिडिओ

वाह मानलं! ८७ वर्षांच्या आजींनी ६३ किलो वजन घटवलं; वेट लॉसची १ सिक्रेट ट्रिक, पाहा व्हिडिओ

वाढत्या वयात लोकांना थकवा येणं, आजार होणं, वजन वाढणं अशा समस्या उद्भवतात. वजन कमी करणं सहजासहजी शक्य होत नाही. पण जर आपण मनापासून ठरवलं तर कोणतीही गोष्ट वयाच्या कोणत्याही टप्प्यावर साध्य करू शकतो. अमृतसरच्या  ८७ वर्षांच्या आजी शकुंतला देवी यांनी आपली जिद्द, शिस्त आणि योगा या ३ गोष्टींच्या बळावर सर्वांना आश्चर्यचकीत करण्यास भाग पाडले आहे. या आजींनी १२३ किलो वजन कमी कमी केलं आहे. त्यांच्या वेट लॉसच्या प्रवासाबद्दल समजून घेऊ. (Weight Loss Journey 87 Year Old Shakuntala Devi Yoga Transformation Journey)

एका कॉमेडी शो मध्ये त्यांनी आपली कहाणी सांगितली

शकुंतला देवी यांनी कॉमेडी शो लाफ्टर शेफ्सच्या दुसऱ्या सिजनमध्ये दिसून आल्या. यात त्यांनी आपला वजन कमी करण्याचा प्रवास सांगितला होता. त्यांनी सांगितलं की त्याचं वजन १२३ किलो होतं. आता त्या फक्त ४० किलोंच्या आहेत. स्टेजवर त्यांच्या शरीरातील लवचीकता आणि ताकद पाहून सर्वचजण आश्चर्यचकीत झाले. सोशल मीडियावर योगासनं आणि पुशअप्स करताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


१२३ किलो पर्यंतचा प्रवास कसा केला?

२००८ मध्ये शकुंतला देवी यांचं वजन वेगानं वाढू  लागलं. वजन वाढल्यामुळे त्यांना चालण्यासाठी, फिरण्यासाठी रोजची कामं करण्यासाठी त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांनी टिव्हीवर बाबा रामदेव यांना योगा करताना पाहिले. त्यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांनी स्वत: योगा करायला सुरूवात केली.

२ मिनिटांत भरपूर पीठ मळण्याची पाहा १ सोपी ट्रिक, चपात्याही होती मऊ-फुगतील टम्म 

त्यानंतर २००९ मध्ये त्या हरिद्वारला गेल्या आणि योगा योग्य पद्धतीनं करायला शिकल्या. त्यांनी आपल्या रोजच्या  जीवनात काही नियम तयार केले. त्या रोज  ४ वाजता उठून योगा करायच्या. औषधांवर अवलंबून न राहता त्यांनी योगाला आपल्या दिनचर्येचा एक भाग बनवले आणि ८३ किलो वजन कमी करण्यात यशस्वी ठरल्या. 

उपवासाला 5 मिनिटांत करा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स, बटाटा न उकडता-न वाळवता पटकन होतील

योगानं पूर्ण जीवन बदललं

शकुंतला देवी यांच्या म्हणण्यांनुसार योगा फक्त तब्येतीसाठी चांगला नसतो तर  मानसिक आरोग्य आणि लाईफस्टाईल चांगली होण्यातही योगामुळे मदत होते. ८७ वर्षांच्या वयात त्या रोज योगा करतात आणि इतरांनाही योगाचं महत्व समजवतात.
 

Web Title: Weight Loss Journey 87 Year Old Shakuntala Devi Yoga Transformation Journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.