Join us

भात की चपाती वजन कमी करण्यासाठी जेवणात काय आणि किती प्रमाणात खायचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 14:03 IST

Is Eating Roti Better Than Eating Rice For Losing Weight : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना भात खावा की चपाती यात गोंधळाची स्थिती निर्माण होते.

वजन कमी करण्यासाठी भात खाणं सोडणं, रात्रीचं कमी जेवणं असे  अनेक प्रयोग लोक करतात.  वजन कमी करण्यासाठी भात खायचा की चपाती  याबाबत नेहमीच लोकांच्या मनात संभ्रम असतो. ( Is Eating Roti Better Than Eating Rice For Losing Weight) वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना भात खावा की चपाती यात गोंधळाची स्थिती निर्माण होते. काहीजण चपाती, भात दोन्ही खाऊन वजन कमी करतात. (Roti or rice what should we eat for  weight loss know expert advice)

कॅलरी काऊंट काय असतो?

दोन चपात्यांमध्ये जवळपास १३० ते १४० कॅलरीज असतात. तर  १०० ग्राम म्हणजेच  अर्धा कप शिजवलेल्या भातात जवळपास १४० कॅलरीज असतात. तर तुम्ही अर्धाी वाटी भात खात किंवा दोन चपाती खात असाल तर समान कॅलरीज घेण्याप्रमाणे आहे.

कोणता भात उत्तम असतो?

तुम्ही कोणता भात खाता हे सुद्धा महत्वाचं असतं. जर तुम्ही पातळ तांदूळ खात असाल तर तुम्हाला लवकर भूक लागेल कारण त्यात फायबर्स  नसतात.  जर तुम्ही ब्राऊन राईस किंवा जाड भात खाल्ला तर  लवकर भूक लागणार नाही बराचवेळ पोट भरलेलं राहील.

चपात्या पटकन होण्यासाठी थेट आचेवर शेकता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? तज्ज्ञ सांगतात....

तुम्ही कोणत्या प्रकारचा भात किंवा चपाती खाता यावर निर्भर असतं की तुमचं वजन वाढणार की नाही. मैद्याची रोटी चुकूनही खाऊ नका कारण ते प्रोसेस्ड फूड आहे. यामुळे एका तासाच्या आत शुगर लेव्हल वाढते.  ज्यांना  ग्लुटेन सेंसिटिव्हीटी आहे ते लोक अशी चपाती खाऊ शकता. गरमीच्या दिवसात ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी न खाता बेसनाची चपाती खा किंवा मल्टीग्रेन चपाती खा.  

खाण्याची योग्य पद्धत कोणती

जर एखादी व्यक्ती इंटरमिटेंट फास्टींग करत असेल तर दुपारी किंवा रात्री एकच मील घेतात. तर काही लोक सकाळी आणि दुपारी हेवी मील घेतात. तर काहीजण रात्री हलकं फुलकं खातात.  अनेकजण  एकावेळी पूर्ण मील आणि फ्रुट्स खातात.  जे आपलं फिटनेस रुटीन फॉलो करतात. दुपारचं जेवण  दुपारी १२ ते २ च्यामध्ये असावं यामध्ये मेटाबॉलिक रेट चांगला असतो. 

डायटिशियन स्वाती बथवाल यांच्यामते  तुम्ही भात खा किंवा चपाती किती प्रमाणात खाताय हे महत्वाचं असतं. जर तुम्ही भरपूर भात खाल्ला तर तो  ७ ते ८ चपात्यांप्रमाणे असेल यामुळे तुमचं वजन वाढू शकतं.  तुम्ही कोणत्याही प्रकारचा भात खा किंवा चपाती खा. त्यात फायबर्सचे प्रमाण अधिक असायला हवे. फायबर्स आपल्या पोटात प्रोबायोटिक्स, चांगले बॅक्टेरिया बनवते. याव्यतिरिक्त मिनरल्स, मिल्टीग्रेन किंवा मिलेट्सची भाकरी वजन कमी करण्यास मदत करते.

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स