वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) बाजारात वेगवेगळ्या प्रकारची चूर्ण उपलब्ध असतात. पण घरच्याघरीसुद्धा तुम्ही हे चुर्ण बनवू शकता. हे चूर्ण सकाळी १ ग्लास पाण्यात घालून प्यायल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल. हे चूर्ण तयार करण्यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरातले मसाले वापरावे लागतील. यात जीरं, बडीशेप, ओवा यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त हिंग आणि काळं मीठ यांचाही तुम्ही वापर करू शकता. वजन कमी करण्याचं चूर्ण कसं तयार करायचं समजून घेऊ. (Weight Loss Churn Mix 1 Spoon In Water And Drink in The Morning Empty Stomach)
रिसर्चगेटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार ओव्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे अप्रत्यक्षपणे वजन कमी करण्यासही मदत होते. यातील घटक पचनसंस्थेवर सकारात्मक परीणाम करतात. तर जिऱ्याच्या सेवनानं भूक कमी होते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते (Ref). जास्त वजन असलेल्या महिलांवर केलेल्या संशोधनात जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात झालेले बदल आणि कोलेस्टेरॉलची पातळी यांवर काय परीणाम होतो हे तपासण्यात आले होते.
वजन कमी करण्याचं चूर्ण कसं बनवावं?
हे चूर्ण तयार करण्यासाठी तुम्हाला बडिशेप, ओवा, जीरं तिन्ही पदार्थ समान प्रमाणात घ्यायचे आहेत. नंतर तव्यावर तिन्ही पदार्थ व्यवस्थित भाजून घ्या आणि थंड होऊ द्या. तिन्ही पदार्थ व्यवस्थित डब्यात भरून त्याची पावडर बनवून घ्या. या चूर्णात काळं मीठ आणि हिंगसुद्धा घाला आणि एअरटाईट डब्यात भरून ठेवा. तुम्ही या चुर्णाचा रोज वापर करू शकता.
वजन कमी करण्यासाठी हे चूर्ण कधी खावं?
सकाळी उठल्यानंतर १ ग्लास कोमट पाण्यात १ चमचा चूर्ण घालून रिकाम्या पोटी प्या. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल. लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे चूर्ण असरदार आहे. रोज रात्रीच्यावेळेसही किंवा झोपताना तुम्ही हे चूर्ण घेऊ शकता.
ओवा, बडीशोप, जीरं या चुर्णाचे फायदे
या चुर्णाचे सेवन केल्यानं गॅसेस, एसिडीटी, ब्लॉटिंगची समस्या कमी होते. हे चूर्ण खाल्ल्यानं पचनक्रिया चांगली राहेत. मेटाबॉलिझ्म वेगानं होतो. लठ्ठपणा हळूहळू कमी होऊ लागतो. बडिशेप पोट थंड ठेवण्यासठी, गॅसेसची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. जीरं आणि ओव्यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटीइंफ्लेमेटरी गुण असतात जे शरीराची सूजज कमी करतात.