Join us  

रोज चालता तरी पोट-मांड्या जाडजूड? किती पाऊल आणि कधी चालावं याचं सोपं गणित, मेंटेन व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 9:55 AM

Walking And Weight Loss Tips : एका अभ्यासानुसार वाढत्या वयात पायी चालण्याची सवय ठेवायला हवी. एका दिवसांत किती स्टेप्स चालाव्यात हे समजायला हवे

आजकालच्या व्यस्त  जीवनशैलीत हेल्दी राहणं फार कठीण झालंय. हेल्दी राहण्यासाठी शारीरिर मानसिक रुपात एक्टिव्ह राहण गरजेचं असतं. (Health tips) यात रेग्युलर एक्सरसाईज करणं फार महत्वाचे आहे. रोज फिरूनसुद्धा तुम्ही स्वत:ला फिजिकली आणि मेंटली फिट ठेवू शकता. (How To Walk To Lose Weight) जास्तीत जास्त लोकांना चालायला आवडतं तर काहीजण स्टेप्स काऊंट करतात. एका अभ्यासानुसार वाढत्या वयात पायी चालण्याची सवय ठेवायला हवी. एका दिवसांत किती स्टेप्स चालाव्यात हे समजायला हवे. (Weight Loss Tips)

एका रिपोर्टनुसार रोज कमीत कमी २ हजार ३०० पाऊलं चालल्याने हार्ट डिसीज आणि डायबिटीससारख्या आजारांचा धोका टळतो. इतकंच नाही तर आजारांशी लढण्यासही मदत होते.  ९ हजार पाऊलं चालणं अधिक प्रभावी ठरतं. रोज  २ हजार २०० पाऊलं चाला किंवा १० हजार पाऊल चाला तुम्ही स्वत:वर फोकस करायला हवा. ज्यामुळे तुमची तब्येत जास्त हेल्दी आणि चांगली राहील.

आजपासूनच चालायला सुरूवात करा

आपल्या घरात चालल्याने किंवा फिरल्याने तुम्हाला  अधिकाधिक फायदे मिळतील जर तुम्ही २००० पाऊलं चालाल तर क्रोनिक आजारांचा धोका टळेल. संथ गतीने चालणं तब्येतीसाठी फायदेशीर ठरू शकतं.  जर तुमचे  वय  जास्त असेल किंवा क्रोनिक डीसिज असतील तर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणं कठीण होऊ शकतं.  म्हणून  संथ गतीने चालणं फायदेशीर ठरू शकतं.

चालण्याची योग्य  वेळ कोणती? 

जर तुम्ही रोज ३० ते ४० मिनिटं वॉक केलं तर ६.५ किमी प्रति तास गती असायला हवी. शरीरानुसार सामान्य स्थितीत  तुम्ही चालू शकता. जर वजन कमी करण्याच्या उद्देशाने वॉक करत असाल तर फास्ट वॉक करा. जर तुम्हाला सकाळी चालायला वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी चाला पण चालणं स्किप करू नका. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स