Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > अच्छा.. तर ‘हे’ आहे लठ्ठपणा वाढण्याचं मुख्य कारण! संशोधनाचा दावा-तुमच्या खाण्यापिण्यात मोठा घोटाळा

अच्छा.. तर ‘हे’ आहे लठ्ठपणा वाढण्याचं मुख्य कारण! संशोधनाचा दावा-तुमच्या खाण्यापिण्यात मोठा घोटाळा

Obesity Main Reason : आतापर्यंत आपण हेच ऐकत आलो आहोत की, जास्त वेळ बसून काम केल्यानं आपलं वजन वाढत आहे. पण असं नाहीये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:07 IST2025-07-19T12:49:45+5:302025-07-19T15:07:25+5:30

Obesity Main Reason : आतापर्यंत आपण हेच ऐकत आलो आहोत की, जास्त वेळ बसून काम केल्यानं आपलं वजन वाढत आहे. पण असं नाहीये...

The real cause of obesity research revealed | अच्छा.. तर ‘हे’ आहे लठ्ठपणा वाढण्याचं मुख्य कारण! संशोधनाचा दावा-तुमच्या खाण्यापिण्यात मोठा घोटाळा

अच्छा.. तर ‘हे’ आहे लठ्ठपणा वाढण्याचं मुख्य कारण! संशोधनाचा दावा-तुमच्या खाण्यापिण्यात मोठा घोटाळा

Obesity Main Reason : लठ्ठपणा जगभरात अनेकांना छळतो आहे. लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. जिममध्ये तासंतास घाम गाळला जातो. वेगवेगळ्या डाएट फॉलो केल्या जातात. आतापर्यंत आपण हेच ऐकत आलो आहोत की, जास्त वेळ बसून काम केल्यानं आपलं वजन वाढत (Obesity Reason) आहे. जंक फूड, फास्ट फूडही यासाठी जबाबदार असतात. पण एका नव्या शोधानं या गोष्टी पूर्णपणे बदलून टाकल्या आहेत. 

एका नव्या शोधातून समोर आलं आहे की, लठ्ठपणा वाढण्याचं खरं कारण आपलं जेवण आहे. म्हणजे आपण जे काही खातो, तेच आपल्याला लठ्ठ बनवत आहे. अमेरिकेच्या ड्यूक यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. हर्मन पॉन्ट्जर आणि त्यांच्या टीमने हा अभ्यास केला आहे. हा शोध Proceedings of the National Academy of Sciences (PNAS) जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

34 देशातील 4,200 लोकांवर अभ्यास

शोधात 34 देशातील 4,200 पेक्षा जास्त लोकांचा अभ्या करण्यात आला आहे. यात अमेरिकेसारख्या देशातील ऑफिस वर्करपासून ते शेती करणाऱ्या लोकांचा समावेश होता. तसेच यातून आढळून आलं की, कुणी अॅक्टिव असो किंवा केवळ बसून काम करत असो, सगळ्यांचा कॅलरी बर्न करण्याचा वेग सारखाच असतो.

वजन वाढण्याचं खरं कारण...

फक्त व्यायाम केला नाही म्हणून लोक लठ्ठ होत नाहीयेत. तर आपलं खाणं-पिणंही त्यासाठी तेवढंच जबाबदार असतं. शोधातून आढळून आलं की, जेव्हा एखादा देश प्रगती करतो, तेव्हा लोकांकडे खायला खूप काही असतं. तेव्हा लोक प्रमाणापेक्षा जास्त खाऊ लागतात. अलिकडे तर लोकांना फास्ट फूड अधिक आवडतं. लोकांची हीच सवय त्यांना हळूहळू लठ्ठ बनवत आहे.

चुकीचं खाणं-पिणं मुख्य कारण..

शोधात डॉ. पॉन्ट्जर यांचं म्हणणं आहे की, लठ्ठपणा वाढण्यामागे सगळ्यात मोठं कारण जास्त खाणं आहे. ते म्हणाले की, व्यायाम कमी करण्याच्या तुलनेत चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे वजन 10 टक्के अधिक वाढतं. दुसरे हेल्थ एक्सपर्ट्स प्रोफेसर बॅरी पॉपकिन आणि डॉ. मोजाफेरियन यांचंही हेच मत आहे की, लोकांनी हे समजायला हवं की, व्यायामापेक्षा जास्त गरजेचं आहे की, आपण हेल्दी आहार घ्यावा.

व्यायामही महत्वाचा

डॉक्टरांनी सांगितलं की, जर खाण्या-पिण्यामुळे लठ्ठपणा वाढत असेल तर याचा अर्थ असा अजिबात नाही की, आपण व्यायाम करणं बंद केलं पाहिजे. जास्त वेळ सोफ्यावर पडून रहावं. व्यायाम केल्यानं आपलं हृदय, मेंदू आणि शरीर फीट राहतं. पण लठ्ठपणा टाळण्यासाठी आहार योग्य असणं गरजेचं आहे.

Web Title: The real cause of obesity research revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.