आजकाल वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयोग आपल्या शरीरावर सतत करत असतो. यामध्ये सर्वात लोकप्रिय आणि सहज वाटणारा सोपा मार्ग म्हणजे 'रात्रीचे जेवण न करणे' किंवा 'डिनर स्किप करणे'. आपल्यापैकी अनेकांना वाटते की रात्री कमी खाल्ल्याने किंवा न खाल्ल्याने वजन भरभर कमी होईल. पण खरोखरच रात्रीचे जेवण न केल्याने वजन कमी होते का? की यामुळे आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात? वजन कमी करण्याच्या नादात आपण अनेकदा शरीराच्या गरजांकडे दुर्लक्ष करतो(is it healthy to skip dinner for weight loss).
रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद करणे हे सुरुवातीला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर वाटू शकते, परंतु दीर्घकाळात त्याचे परिणाम शरीरावर कसे होतात, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेटलॉस करण्यासाठी रात्रीचे जेवण पूर्णपणे टाळणे खरोखरच योग्य आहे का, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. बऱ्याचजणांना असं वाटतं की, रात्री न जेवल्याने कॅलरीज वाचतील आणि वजन झरझर कमी होईल. पण, खरंच वजन कमी करण्याचा हा मार्ग फायदेशीर आहे का? की आपण वजनाच्या नादात आपल्या (is skipping dinner good for weight loss) आरोग्याशीच खेळत आहोत? रात्रीचं जेवण (skipping dinner for weight loss) स्किप करणं योग्य की अयोग्य, आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम काय ते पाहूयात...
वेटलॉस करण्यासाठी रात्रीचे जेवण स्किप करणे योग्य की अयोग्य ?
आजकाल वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे डाएट ट्रेंड फॉलो करताना दिसतात. त्यापैकी एक कॉमन ट्रेंड म्हणजे डिनर स्किप करणे. अनेकांना असे वाटते की जर त्यांनी रात्रीचे जेवण सोडले तर त्यांचे वजन लवकर कमी होईल. पण न्यूट्रिशनिस्ट सोनिया नरंग यांच्या मते, फक्त डिनर सोडल्याने वजन कमी होईलच असे नाही. वजन कमी करण्याचा खरा नियम काही वेगळाच असतो.
बाहेरचं खाणं तर लांबच, तैमूर साधा केकही खात नाही! आई करीनाची शिस्त, लेकाचं डाएट कडक...
जिम - डाएट करूनही वजन कमीच होत नाही? मग स्वयंपाकाची ‘अशी’ रीत बदला, वजन घटायला लागेल झरझर...
वजन कमी करण्याचा खरा नियम...
तज्ज्ञांच्या मते, वजन कमी होणे किंवा वाढणे यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकूण कॅलरीज (Total Calories) होय. जर तुम्ही दिवसभरात तुमच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेत असाल, तर तुमचे वजन वाढेल आणि जर तुम्ही गरजेपेक्षा कमी कॅलरीज घेत असाल, तर वजन कमी होऊ लागेल. याचा अर्थ असा की, वजन कमी करण्यासाठी तुम्ही रात्रीचे जेवण सोडणे गरजेचे नसते. खरंतर, दिवसभराच्या एकूण कॅलरींकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे असते.
कॅलरीज कधी खाताय, याने फरक पडत नाही...
न्युट्रिशनिस्ट सोनिया नरंगच्या मते, अनेकांना असे वाटते की रात्री जेवल्यामुळे वजन वाढते, पण असे अजिबात नाही. तुम्ही तुमच्या कॅलरी सकाळी खाता, दुपारी खाता की रात्री यावर काहीच अवलंबून नसते. जोपर्यंत तुमच्या एकूण कॅलरीज संतुलित आहेत, तोपर्यंत वजनावर फारसा फरक पडत नाही. त्यामुळे, जर एखादी व्यक्ती आपल्या कॅलरीज ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये विभागून घेत असेल, तरीही ते ठीक आहे; आणि जर एखादी व्यक्ती सकाळी जास्त कॅलरी घेऊन रात्री कमी खात असेल, तर ते सुद्धा योग्य असू शकते.
शरीराच्या गरजेनुसार डाएट निवडा...
प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते. काही लोकांना हलके रात्रीचे जेवण केल्यामुळे चांगले वाटते, तर काही लोकांना योग्य प्रमाणात जेवण केल्यावर जास्त ऊर्जा मिळते. जर रात्रीचे जेवण सोडल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा, थकवा किंवा जास्त भूक जाणवत असेल, तर ही पद्धत तुमच्यासाठी योग्य नाही.
डिनर स्किप करणे कधी ठीक असू शकते?
जर एखाद्या व्यक्तीला रात्रीचे जेवण हलके ठेवल्यामुळे पोट फुगण्याच्या समस्येचा त्रास होत नसेल, शरीर हलके वाटत असेल आणि झोप चांगली येत असेल, तर ती व्यक्ती ही डाएटची पद्धत वापरु शकते. परंतु, फक्त वजन कमी करण्यासाठी डिनर सोडणे योग्य नाही.
संतुलित आहार सर्वात महत्त्वाचा...
निरोगी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी तुम्ही संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि तुमच्या एकूण कॅलरींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जेव्हा या सर्व गोष्टी योग्य असतात, तेव्हा वजन कमी करणे सोपे जाते. वजन कमी करण्यासाठी फक्त डिनर सोडणे गरजेचे नाही. खरी गोष्ट ही आहे की तुम्ही दिवसभरात किती कॅलरीज घेत आहात. त्यामुळे आपल्या शरीराच्या गरजेनुसार डाएट निवडा आणि संतुलित आहार करण्याची सवय लावा.
Web Summary : Skipping dinner isn't a weight-loss guarantee. Focus on total daily calories. Balanced diets, exercise, and adequate sleep are crucial. Choose a diet that suits your body.
Web Summary : रात का खाना छोड़ना वजन घटाने की गारंटी नहीं है। कुल दैनिक कैलोरी पर ध्यान दें। संतुलित आहार, व्यायाम और पर्याप्त नींद महत्वपूर्ण हैं। ऐसा आहार चुनें जो आपके शरीर के अनुकूल हो।