Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दिवसाची सुरुवात 'हे' पाणी पिऊन करा- अजिबात थकवा येणार नाही, आजारपणं दूर पळतील..

दिवसाची सुरुवात 'हे' पाणी पिऊन करा- अजिबात थकवा येणार नाही, आजारपणं दूर पळतील..

Healthy Way To Start Your Day: नेहमीच खूप गळून गेल्यासारखं, थकल्यासारखं होत असेल तर हा एक सोपा उपाय रोजच्या रोज करायला सुरुवात करा...(how to get rid of tiredness?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2025 15:07 IST2025-08-06T15:06:32+5:302025-08-06T15:07:26+5:30

Healthy Way To Start Your Day: नेहमीच खूप गळून गेल्यासारखं, थकल्यासारखं होत असेल तर हा एक सोपा उपाय रोजच्या रोज करायला सुरुवात करा...(how to get rid of tiredness?)

simple remedies to get energy, how to get rid of tiredness, healthy way to start your day | दिवसाची सुरुवात 'हे' पाणी पिऊन करा- अजिबात थकवा येणार नाही, आजारपणं दूर पळतील..

दिवसाची सुरुवात 'हे' पाणी पिऊन करा- अजिबात थकवा येणार नाही, आजारपणं दूर पळतील..

Highlightsतुमच्या शरीरातली पोषणमुल्यांची कमतरता भरून निघेल आणि दिवसभर पुरेल एवढी भरपूर एनर्जी मिळेल.

बऱ्याच जणी अशा असतात ज्यांना घर, ऑफिस अशा दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. ऑफिसचा ताण, घरची कामं हे सगळं कधी ना कधी खूप असह्य होतं आणि त्याचा ताण शरीरावर, मनावर येतो. त्यामुळे खूप थकल्यासारखं होतं. कोणतंच काम करण्याचा उत्साह नसतो. दिवसभरात एवढं गळून गेल्यासारखं होतं की कधी एकदा अंथरुणावर पाठ टेकवू असं होऊन जातं. असा त्रास तुम्हाला सतत होत असेल तर दिवसाची सुरुवात एका खास पद्धतीने करा (how to get rid of tiredness?). यामुळे तुमच्या शरीरातली पोषणमुल्यांची कमतरता भरून निघेल आणि दिवसभर पुरेल एवढी भरपूर एनर्जी मिळेल.(Healthy Way To Start Your Day)

 

अंगातला थकवा कमी करणारा खास उपाय

याविषयीचा एक व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी fitelo_tamil या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी दिवसाच्या सुरुवातीला वेगवेगळे पदार्थ घातलेलं पाणी प्यायला सांगितलं आहे.

Rakshabandhan Gift Ideas: चांदीच्या नाजूक मंगळसुत्रांचे ७ डिझाइन्स, खिशाला परवडेल आणि बहिणीलाही आवडेल

हा उपाय करण्यासाठी आदल्यादिवशी रात्री एक पदार्थ १ ग्लास पाण्यात भिजत घालायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी रिकाम्या पोटी प्यायचं. ते पदार्थ नेमके कोणते आणि त्यामुळे काय फायदा होतो ते पाहूया..

१. मेथी दाणे भिजत घातलेलं ग्लासभर पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहाते, पोट फुगण्याचा त्रास होत नाही आणि पचनक्रिया व्यवस्थित राहाते.

 

२. धणे भिजत घातलेलं पाणी प्यायल्यास शरीर डिटॉक्स होते. अंगातली उष्णता कमी होऊन हार्मोन्सही संतुलित राहतात.

लहानशा कारणामुळेही डिप्रेशन येतं- एन्झायटी वाढते? रामदेव बाबा सांगतात ३ उपाय- मन शांत होईल

३. जर पचनक्रिया नेहमीच बिघडलेली असेल, सतत साखर किंवा गोड खाण्याची इच्छा होत असेल तर दालचिनी भिजत घातलेलं पाणी प्यावं.

४. चिया सीड्सचं पाणी पिणंही खूप उपयुक्त ठरतं. त्यामुळे भरपूर प्रमाणात फायबर मिळतात आणि पचनक्रिया सुधारते.

 

५. ओवा आणि जिरे भिजत घातलेलं पाणी प्यायल्यास अपचनाचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो. चयापचय क्रिया अधिक चांगली होते.

नुसताच बर्फ लावण्यापेक्षा 'या' आईस क्यूबने त्वचेला मालिश करा! ड्राय- डल त्वचा दिसेल ग्लाेईंग

६. बडिशेप, जिरे यांचं पाणी एकत्रित करून प्यायल्यास शरीरावरील सूज कमी होते. त्यामुळे वेटलॉस होण्यासाठी मदत होते आणि पचनक्रियाही चांगली होते.

७. मनुका भिजत घातलेलं पाणी प्यायल्यास अंगातला थकवा कमी होतो. एचबी वाढण्यास मदत होते.  


 

Web Title: simple remedies to get energy, how to get rid of tiredness, healthy way to start your day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.