Weight Loss Tips: बदललेली लाइफस्टाईल, बिझी शेड्युल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि इतरही काही कारणांमुळे आजकाल वजन कंट्रोलमध्ये ठेवणं एक मोठं आव्हान बनलं आहे. त्याहून चिंतेची बाब म्हणजे एकदा का वजन वाढलं, शरीरात चरबी जमा झाली तर वेगवेगळे आजारही होतात. बऱ्याचदा तर वजन कमी करण्यासाठी केलेले वेगवेगळे प्रयत्नही फेल होतात. फक्त जिमला जाऊन किंवा आहारात बदल करून वजन कमी करता येईल असं नाही. यासाठी काही हेल्दी सवयी (Healthy Habits) सुद्धा तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. अशाच काही सवयींबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कमी शुगर
जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल तर शुगर बंद करावी लागेल. पण शुगर घेणं एकदम बंद न करता हळूहळू बंद करा. काही गोड खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही फळं खाऊ शकता. त्यातून तुम्हाला शरीरासाठी आवश्यक पोषण मिळेल आणि वजनही कमी होईल.
प्रोटीन मिळवा
शरीरात जर प्रोटीनची कमतरता झाली असेल तर मेटाबॉलिज्म स्लो होतं. ज्यामुळे वजन कमी करण्यात अडथळा येतो. अशात डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश करा. पनीर, मोड आलेले कडधान्य यातून तुम्ही प्रोटीन मिळवू शकता. यानं स्नायू मजबूत होतील आणि चरबी सुद्धा कमी होईल.
चालायला विसरू नका
वजन कमी करण्यासाठी सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत पायी चालणं आहे. रोज किमान 40 मिनिटं वॉक केल्यास ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. चरबी कमी करण्यास मदत मिळते. पायी चालण्याचा आणखी एक चांगला फायदा म्हणजे यानं मूडही चांगला राहतो.
भरपूर पाणी प्या
दिवसभरातून किमान तीन ते चार लीटर पाणी पिण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देतात. वजन कमी करण्याचा हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. पाण्यानं पचन चांगलं होतं, मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. तसेच पाण्यानं भूकही कंट्रोल होते. त्याशिवाय पाण्यानं शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडतात. यानंही वजन कमी करण्यास मदत मिळते.
पुरेशी झोप
वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं ठरतं. झोपेची क्वालिटी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. पुरेशी झोप घ्याल तर हॅप्पी हार्मोन्स रिलीज होता. ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. रोज सात ते आठ तासांची झोप वजन कमी करण्यासोबतच एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी गरजेची ठरते.