वाढते वजन ही सध्याची फार मोठी समस्या झाली आहे. आजकाल प्रत्येकजण आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतात. सतत वाढणारे वजन ही इतकी कॉमन समस्या (Shilpa Shirodkar reveals diet secrets behind drastic 14 kg weight loss at 51) झाली आहे की सामान्य व्यक्तींपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या वाढत्या वजनाने हैराण झाले आहेत. वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट, योगा, एक्सरसाईजचे ट्रेंड फॉलो करतात(Shilpa Shirodkar on achieving 14kg weight loss in three months)
मोठमोठे सेलिब्रिटींज असे अनेक प्रकारचे फिटनेस ट्रेंड फॉलो करून वजन कमी करतात. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्यावर त्याचा ट्रेंड तयार होतो आणि तो ट्रेंड आपण फॉलो करतो. नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस फेम शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) यांनी देखील १३ ते १४ किलो वजन कमी केल्याचे समोर येत आहे. त्यांनी वजन कमी करण्यासाठी OMAD डाएट प्लॅन फॉलो केला होता. OMAD म्हणजे 'वन मील ए डे' असा या डाएट प्लॅनचा ट्रेंड आहे. हा 'वन मील ए डे' डाएट प्लॅन फॉलो करून तुम्ही वजन कसे कमी करु शकता तसेच हा ट्रेंड नेमका काय आहे ते पाहूयात.
शिल्पा शिरोडकर यांनी असे केले वजन कमी...
शिल्पा शिरोडकर यांनी एका विशेष मुलाखती दरम्यान आपले फिटनेस सिक्रेट शेअर केले आहे. त्यांनी सांगितले की, मी माझे वजन नियंत्रणात ठेवण्याचा आणि तंदुरुस्त राहण्याचा निश्चय केला होता, आणि त्यामुळेच मी माझ्या आहाराची विशेष काळजी घेत होते.
ऑफिसमध्ये एकाच जागी बसून मांड्या जाडजूड झाल्या ? करा 'ही' ४ योगासनं, मांड्यांची चरबी घटेल लवकर...
OMAD (वन मील ए डे) डाएट प्लॅन म्हणजे काय?
आपल्या डाएट बद्दल बोलताना शिल्पा शिरोडकर सांगतात की, अधूनमधून उपवास आणि आहारावर नियंत्रण यासारख्या गोष्टी वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. शिल्पा शिरोडकर यांनी वजन कमी करण्यासाठी OMAD (वन मील ए डे) चा खास डाएट प्लॅन निवडला होता. यामध्ये दिवसातून फक्त एकदाच खायचे यासाठी या डाएट प्लॅनला 'वन मील ए डे' असे म्हटले जाते. हा डाएट प्लॅन फॉलो केल्याने दररोजचा कॅलरी इंनटेक कमी करण्यास मदत होते.
उन्हाळ्यांत आहारामध्ये करा 'हे' ५ बदल, अपचन - डिहायड्रेशन होणार नाही - उन्हाळा जाईल सुखकर...
ब्रा फॅट्स दिसल्याने शरीर बेढब दिसते? ४ सोपे व्यायाम करतात ब्रा फॅट्स कमी...
दिवसातून एकदा जेवण करणे हा एक प्रकारचा उपवासच आहे. विशिष्ट कालावधीत मर्यादित कॅलरीज इंनटेक केल्यास आपण अगदी सहजपणे वजन कमी करु शकतो. हा विशेष डाएट प्लॅन वजन कमी करण्याव्यतिरिक्त, इतर अनेक आरोग्यदायी फायदे देखील आपल्या शरीराला मिळतात.
OMAD 'वन मील ए डे' या डाएट प्लॅनमध्ये दिवसभरातून फक्त एकदा खाणे आणि उर्वरित दिवस उपवास केला जातो किंवा मोजकेच खाल्ले जाते. या प्रकारच्या आहारामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. या डाएट प्लॅनमुळे हृदयरोगाची जोखीम कमी करण्यास, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि शरीरातील जळजळ कमी करण्यास देखील फायदेशीर ठरू शकते.