Join us
Daily Top 2Weekly Top 5

समंथा प्रभू सांगते २१ दिवसांत वजन कमी करण्याचं सिक्रेट, पोट होते कमी आणि दिसता एकदम फिट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2026 18:00 IST

Samantha Ruth Prabhu morning routine for weight loss in 21 days : Samantha Ruth Prabhu fitness secrets : सामंथाचं स्पेशल मॉर्निंग रुटीन, दिवसभर ॲक्टिव्ह राहण्यासाठी ती लाईफस्टाईलमध्ये करते 'हे' छोटे बदल...

दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आज लाखो तरुणींची 'फिटनेस आयकॉन' बनली आहे. समंथा केवळ तिच्या पडद्यावरील भूमिकेसाठीच नाही, तर तिच्या शिस्तबद्ध लाईफस्टाईलसाठी ओळखली जाते. अनेकांना प्रश्न पडतो की, इतक्या बिझी शेड्युलमध्येही समंथा स्वतःला इतकी फिट, एनर्जेटिक कशी काय ठेवते? याचं सर्वात मोठ सिक्रेट लपलेले आहे तिच्या 'पॉवर मॉर्निंग' रुटीनमध्ये...समंथाच्या मते, दिवसाची सुरुवात कशी होते, यावर तुमचा संपूर्ण दिवस आणि आरोग्य अवलंबून असते. समंथा फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी व्यायामापासून आहारापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेते(Samantha Ruth Prabhu morning routine for weight loss in 21 days).

समंथाने अलीकडेच तिच्या अशा ८ सवयींबद्दल सांगितले आहे, ज्या ती सकाळी उठल्यानंतर न चुकता फॉलो करते. या सवयींमुळे  शारीरिक सूज कमी होण्यासोबतच, वेटलॉस, पोटावरची हट्टी चरबी जाळण्यास (Samantha Ruth Prabhu fitness routine) मदत होते. इतकंच नाही तर शरीराची नैसर्गिकरीत्या बरे होण्याची म्हणजेच 'सेल्फ-हीलिंग'ची क्षमता देखील वाढते. शारीरिक सुदृढतेसोबतच मानसिक शांतता मिळवण्यासाठी समंथा नक्की काय करते? तिचे 'पॉवर मॉर्निंग' रुटीन नेमके कसे असते ते पाहूयात...फिटनेस क्वीन समंथाचं मॉर्निंग रुटीन, दिवसभर ॲक्टिव्ह राहण्यासाठी ती लाईफस्टाईल (Samantha Ruth Prabhu fitness secrets) मध्ये असे कोणते बदल करते पाहा... 

 समंथा सांगते, वेटलॉस आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ८ सवयी... 

१. सकाळी उठल्या उठल्या जगभरात काय चाललंय हे पाहण्याऐवजी समंथा म्हणते स्वतःकडे लक्ष द्या. उठल्यानंतर पहिली ६० मिनिटे ती फोन - मोबाईल पासून पूर्णपणे लांब राहते. यामुळे मनावर अनावश्यक माहितीचा ताण येत नाही आणि दिवसाची सुरुवात शांततेत होते.

२. मनाला एकाग्र करण्यासाठी ती दररोज किमान पाच मिनिटे पूर्णपणे शांत बसून दीर्घ आणि जाणीवपूर्वक श्वास घेते. यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो आणि विचारांमध्ये स्पष्टता येते.

जिमला न जाताच कपिल शर्मा 'असा' झाला फिट! ६३ दिवसांत ११ किलो वेटलॉस करण्याचं सिक्रेट - पाहा नेमकं करायचं काय? 

३. हळूवार आणि संथ गतीने श्वास घेतल्यामुळे शरीरातील नर्व्हस सिस्टीम सक्रिय होते. ही नस सक्रिय झाली की ती मेंदूला 'तुम्ही सुरक्षित आहात' असा सिग्नल देते. यामुळे केवळ मेंदूची कार्यक्षमताच वाढत नाही, तर शरीरातील स्ट्रेस कमी होऊन वजन घटवण देखील सोपे जाते.

४. सकाळी उठल्यानंतर पहिल्या १० मिनिटांच्या आत कोवळ्या उन्हात जाणे सामंथाच्या रुटीनचा अविभाज्य भाग आहे. चेहऱ्यावर आणि शरीरावर सूर्यप्रकाश पडल्यामुळे शरीरातील 'सर्कॅडियन रिदम' (Circadian Rhythm) म्हणजेच शरीराचे नैसर्गिक घड्याळ सेट होते. यामुळे रात्री चांगली झोप लागते आणि शरीरात व्हिटॅमिन - डी ची पातळी वाढून ऊर्जा टिकून राहते.  

ना झिरो फिगर, ना सिक्स पॅक्स! फिट राहण्यासाठी इतके सेकंद 'एका पायावर' उभे राहून दाखवा; बघा तुम्हाला जमते का?

५. सामंथा आपल्या दिवसाची सुरुवात एका खास हेल्दी ड्रिंकने करते. सकाळी उठल्यावर ती कोमट पाण्यात लिंबाचा रस, हळद, अँपल सायडर व्हिनेगर आणि ऑरगॅनिक ऑलिव्ह ऑईल घातलेलं मॉर्निंग ड्रिंक पिते. 

६. सामंथा आपल्या दिवसाची सुरुवात अशा नाश्त्याने करते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि फायबरयुक्त असा नाश्ता घेतल्याने रक्तातील साखर अचानक वाढत नाही. यामुळे दिवसभर गोड पदार्थ किंवा 'अनहेल्दी स्नॅक्स' खाण्याची इच्छा होत नाही आणि शरीरातील ऊर्जा टिकून राहते. 

७. यासोबतच ती पुरेसा एक्सरसाइज देखील करण्यावर अधिक भर देते. यामुळे शरीरातील मेटाबॉलिझमचा वेग वाढतो आणि आपण दिवसभर अधिक फ्रेश आणि एनर्जेटिक राहतो. 

८. बहुतेक लोक सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतात, पण सामंथा तसे करत नाही. ती तिचा नाश्ता पूर्ण झाल्यावरच कॅफिनयुक्त चहा, कॉफी पिते. यामुळे पचनसंस्थेवर ताण येत नाही आणि ॲसिडिटीसारख्या समस्यांपासून बचाव होतो.

तुमच्या दिवसाची सुरुवात जर योग्य झाली, तर त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या संपूर्ण दिवसावर आणि कामावर होतो. अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूच्या मते, जर तुम्ही व्यायामापासून आहारापर्यंत सर्व काही व्यवस्थित करत असाल, तरीही तुमच्या पोटाची चरबी कमी होत नसेल, त्वचेमध्ये सतत खाज किंवा जळजळ जाणवत असेल आणि सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा सुजलेला दिसत असेल, तर याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या 'मॉर्निंग रुटीन' वर पुन्हा एकदा लक्ष देण्याची गरज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Samantha Prabhu's secret to weight loss: 21-day fitness plan.

Web Summary : Samantha Prabhu reveals her 'power morning' routine for weight loss, reduced bloating, and overall fitness. Her routine includes mindful breathing, sunlight exposure, a healthy drink, balanced breakfast, exercise, and avoiding caffeine on empty stomach.
टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स