Weight Loss Diet : हिवाळ्यातील दिवसांमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. या दिवसांमध्ये आहारातील बदल आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेक समस्या निर्माण होतात. पण या ऋतूमध्ये काही फळे खाणे शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतं. त्यापैकी केळं हे एक असं फळ आहे जे केवळ टेस्टीच नाही तर आरोग्यासाठीही खूप उपयोगी आहे. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न असतो. कच्चं केळं अधिक फायदेशीर की पिकलेलं? चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कच्चं आणि पिकलेलं केळं यात काय फरक आहे आणि कोणते निवडावे.
पिकलेल्या केळ्याचे फायदे
पिकलेल्या केळ्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ते ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अधिक असतो, म्हणजेच ते शरीराला पटकन ऊर्जा पुरवतं. पचनासाठी पिकलेलं केळं हलकं आणि सोपं असतं. त्यामुळे लहान मुलं आणि खेळाडूंसाठी पिकलेलं केळं आदर्श मानलं जातं.
कच्च्या केळ्याचे फायदे
कच्च्या केळ्यात रेझिस्टंट स्टार्च असतो. हा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे. जो पचनाची प्रक्रिया स्लो करतो आणि ब्लड शुगर नियंत्रित ठेवतो. यात फायबरचं प्रमाण जास्त असतं, जे पचनसंस्थेसाठी चांगलं असतं. डायबिटीस किंवा इन्सुलिन रेसिस्टन्स असलेल्या लोकांसाठी कच्चं केळं अधिक फायदेशीर ठरतं.
वजन कमी करण्यासाठी कोणतं केळं योग्य?
वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी कच्चं केळं सर्वोत्तम पर्याय आहे. यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतं, त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि जास्त खाणं टाळता येतं, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.
कच्चं की पिकलेलं – कोणते चांगले?
एक्सपर्टच्या मते, दोन्ही प्रकारची केळी आपल्या-आपल्या फायद्यांसाठी उपयोगी आहेत. पिकलेले केळं ऊर्जेसाठी उत्तम, तर कच्चं केळं पचन आणि ब्लड शुगर नियंत्रणासाठी उत्तम.