Join us  

दिवसभरात किती लिटर पाणी प्यावे? पाहा पाणी पिण्याची योग्य पद्धत-वजनही होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 11:24 AM

Right Time To Drink Water : दिवसाला रोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायलाच हवं.

पाणी प्यायल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. तहान भागवण्यासाठी पाणी पिणं गरजेचं असतं. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवं.  (Health Tips) एक्सपर्ट्स सांगतात की दिवसभरात ३ लिटर पाणी प्यायला हवं.  तर काहीजण गरजेपेक्षा जास्त पाणी पितात. त्यांना तहान लागलेली नसतानाही पाण्याचे सेवन करतात. (Health What Happens To Body When You Drink Too much Water It Can Cause Overhydration)

ज्याला ओव्हरहायड्रेशन असं म्हटलं जातं. वेबएमडीच्या रिपोर्टनुसार रोज किती पाणी प्यावं याचा निर्धारित फॉर्म्यूला नाही. दिवसाला रोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायलाच हवं. व्यायाम, आहार, गर्भावस्था, स्तनपान यांसारख्या गोष्टींनुसार पाणी पिण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. (When Is The Right Time To Drink Water) 

जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने काय होते?

वेबएमडीच्या रिपोर्टनुसार जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला वॉटर पॉईजनिंग, इन्टॉक्सिकेशन किंवा  मेंदूच्या कार्यप्रणालीववर परिणाम दिसू शकतो. असं होतं तेव्हा शरीरात खूप जास्त पाणी होते आणि सूज होत आणि मेंदूच्या पेशींवर दबाव येतोय.  डोकेदुखी  उद्भवते, हाय ब्लड प्रेशर, ब्रॅडी कार्डिया किवा हृदयाची गती कमी होणं अशा समस्या उद्भवतात.

गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल

एका दिवसाला किती पाणी प्यावे?

पाणी पिण्याशी संबंधित कोणताही व्हेरिफाईड गाईडलाईन्स नाहीत. फिजिकल एक्टिव्हीटीज, क्लायमेट, वजन, लिंग यावर ते अवलंबून असते. १९ ते ३० वर्षांच्या महिलांनी जवळपास २.७ लिटर पाणी प्यायला हवं. या वयाच्या पुरूषांनी जवळपास ३.७ लिटर पाणी प्यायला हवं दिवसभरात ८ ग्लास पाणी प्यायला हवं. 

ओव्हरहायड्रेशन म्हणजेच शरीरात अत्याधिक पाणी असल्यामुळे डोकेदुखी, हाय-पाय दुखणं, ओठांचा रंग बदलणं अशा समस्या उद्भवू शकतात. शरीरात अत्याधिक हायड्रेटेशन असल्यास हात, पाय, ओठांची सूज कमी होण्यास मदत होईल.  अधिक पाणी प्यायल्याने शरीराताल इलेक्ट्रोलाईट लेव्हल कमी होते.

शरीराचा व्यवस्थित बॅलेंन्स राहतो. इलेक्ट्रोलाईट लेव्हल कमी झाल्याने मांसपेशीत वेदना, क्रॅम्प, कमकुवतपणा जाणवतो. ओव्हरहायड्रेशन झाल्यामुळे उलट्यांची समस्या उद्भवते. जेव्हा शरीरात जास्त पाणी होतं तेव्हा किडनी अतिरिक्त तरल पदार्थ म्हणजेच लिक्वीड बाहेर काढते. अशावेळी उलट्या, जुलाब अशी समस्या उद्भवू शकते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स