Winter Weight Loss Diet Tips : थंडीला अजून हवी तशी सुरूवात झाली नसली, तरी या दिवसांमध्ये होणाऱ्या समस्यांनी थोडं थोडं वर काढलं आहे. काही ठिकाणी हलकी तर काही ठिकाणी जरा जास्त थंडी जाणवू लागली आहे. हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक वजन वाढत असल्याची तक्रार करतात. यात तथ्यही आहेच की, या काळात वजन झपाट्याने वाढतं, त्यामुळे वजन वाढण्याची चिंता अनेकांना सतावते. पण हिवाळ्यात वजन वाढतं तरी का? यामागील काही प्रमुख कारणं आपण पाहणार आहोत.
थंड वातावरणामुळे शरीराची हालचाल कमी होते. सकाळी चालायला जाणं किंवा जिमला जाणं टाळलं जातं. परिणामी, शरीर कमी सक्रिय राहतं आणि कॅलरीज जळत नाहीत, त्यामुळे वजन वाढतं. याशिवाय, हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही बदल होतो. त्यामुळे शरीरात फॅट साठू लागतं.
हिवाळ्यात वजन वाढण्याची 5 कारणं
जास्त कॅलरीचं अन्न – चहा, सूप, मिठाई, गरम स्नॅक्स यांचं इनटेक वाढतं.
शरीराची कमी हालचाल – थंडीमुळे घराबाहेर कमी पडतो, त्यामुळे कॅलरी जळत नाही.
मेटाबॉलिझम स्लो होतं – शरीर थंडीत कमी ऊर्जा वापरतं, त्यामुळे फॅट जमा होतं.
कमी पाणी पिणं – थंडीमुळे तहान कमी लागते, त्यामुळे पाणी कमी प्यायल्याने मेटाबॉलिझम स्लो होतं.
गोड आणि खारट पदार्थांचं जास्त सेवन – गजक, चिक्की, तळलेले पदार्थ यामुळे कॅलरी वाढतात.
काय टाळावं?
तळलेले पदार्थ आणि जंक फूड, जास्त साखर असलेल्या मिठाई टाळा, प्रोसेस्ड मांस (जसे बेकन, सॉसेज), जास्त फॅट असलेले पदार्थ (जसे लोणी, मार्जरीन) टाळा.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावं
संतुलित आहार घ्या: डाळी, पनीर आहारात घ्या.
धान्य खा: मका, बाजरी, ज्वारी, ओट्स यांचा समावेश करा.
हंगामी फळं आणि भाज्या खा: सफरचंद, संत्री, पपई यांचा समावेश करा.
व्यायाम करा: रनिंग, जिम किंवा योगासनांचा सराव करा.