Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > प्रोटीन पावडर घेऊन वजन घटवण्याचे अघोरी प्रयोग येतात अंगाशी, लिव्हरसह किडनीलाही धोका

प्रोटीन पावडर घेऊन वजन घटवण्याचे अघोरी प्रयोग येतात अंगाशी, लिव्हरसह किडनीलाही धोका

वजन झटपट कमी करायचं म्हणून प्रोटीन पावडर खाता? फिटनेस बाजूलाच, आजारांचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2024 06:51 PM2024-04-03T18:51:35+5:302024-04-03T19:21:33+5:30

वजन झटपट कमी करायचं म्हणून प्रोटीन पावडर खाता? फिटनेस बाजूलाच, आजारांचा धोका!

protein powder-protein shake good for health? what's the side effect on health? | प्रोटीन पावडर घेऊन वजन घटवण्याचे अघोरी प्रयोग येतात अंगाशी, लिव्हरसह किडनीलाही धोका

प्रोटीन पावडर घेऊन वजन घटवण्याचे अघोरी प्रयोग येतात अंगाशी, लिव्हरसह किडनीलाही धोका

Highlightsआपण जेव्हा अतिरिक्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट खात असतो तेव्हा त्यातल्या न वापरलेल्या ग्लुकोजचे रूपांतर चरबी म्हणजेच फॅट्समध्ये होत असते.

मंजिरी कुलकर्णी

वजन कमी करण्यासाठी मील रिप्लेसमेंट शेक्स किंवा एखादी पावडर पाण्यामध्ये घालून ते पिणं असं आजकाल अनेकजण करतात. शक्यतो अशा प्रकारच्या शेक्समधे प्रोटीनची मात्रा खूप जास्ती असते आणि त्यामध्ये असे काही घटक असतात ज्याने पोट भरण्याची जाणीव निर्माण होते. डाएट आणि व्यायाम करण्यापेक्षा हा मार्ग कधीही सोयीस्कर वाटतो. जेवणाच्या ऐवजी ग्लासभर शेक प्यायचा पर्याय मग निवडला जातो. खरंतर आतापर्यंत सर्वांनाच हे माहिती झाले आहे की वजन कमी करायचे असेल तर आहारातील कार्बोहाइड्रेट कमी करून प्रोटीन वाढवले तर वजन कमी होण्यासाठी मदत होते. पण आपण जेव्हा अतिरिक्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट खात असतो तेव्हा त्यातल्या न वापरलेल्या ग्लुकोजचे रूपांतर चरबी म्हणजेच फॅट्समध्ये होत असते.

पण प्रोटीनच्या बाबतीत विचार केला तर प्रोटीनचे विघटन लिव्हरमध्ये होत असते. ते विघटन होत असताना त्यामध्ये अमोनिया हा विषारी पदार्थ तयार होत असतो. त्यामुळे आहारामध्ये जेवढे जास्त प्रोटीन तुम्ही घ्याल तेवढा जास्त प्रमाणामध्ये अमोनिया तयार होतो आणि लिव्हरवर लोड येत असतो. तयार झालेला अमोनिया बाहेर फेकण्यासाठी लिव्हर तो किडनीकडे पाठवतो. मग किडनीवरसुद्धा लोड येतो.
जेव्हा तुम्ही पावडर फॉर्ममध्ये प्रोटीन घेत असता तेव्हा ते प्रोटीन हे प्युअर फॉर्ममध्ये असते. त्यामुळे एका चमचामध्ये जवळपास २० ते २५ ग्रॅम प्रोटीन असते. हे घेतल्यानंतर २५ ग्रॅम प्रोटीन अचानक तुमच्या लिव्हरला पचवावे लागते.



(Image ;google)

हे सारे करावे का?


१. आजकाल प्लांट प्रोटीन नावाने नवीन मार्केटिंग सुरू झालेले आहे आणि हेसुद्धा मिल रिप्लेसमेंट शेक म्हणून वापरले जाते. आपण सहज असा विचार करतो की प्लांट प्रोटीन आहे म्हणजे हे नॅचरल आहे आणि त्यामुळे त्याचे तितके साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होणार नाहीत. २. पण प्रोटीन किंवा कुठलाही मॉलिक्युल त्याच्या मूळ रूपापासून सेपरेट केल्यानंतर तो नॅचरल राहत नाही. उदाहरणार्थ, आपण जेव्हा डाळ खातो तेव्हा त्यातील प्रोटीन हे नॅचरल असते, परंतु डाळीमधून जर प्रोटीन सेपरेट केले तर ते प्रोटीन नॅचरल राहत नाही.
३. इन्सुलिन हा एक हार्मोन असा आहे, ज्याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे शरीरामध्ये वजन वाढते. प्रोटीनमधल्या प्रकारांमध्ये काही प्रोटीन असेसुद्धा असतात, ज्यामुळे हे इन्सुलिन तयार होण्यासाठी मदत होते. त्यांना इन्सुलिनोजेनिक प्रोटीन असं म्हणतात.

४. मुळात ही मिल रिप्लेसमेंटची संकल्पनाच नैसर्गिक नाही. आपल्या शरीरासाठी कोणत्या गोष्टी किती प्रमाणात लागतात हे आता संशोधनानंतर व्यवस्थित माहिती आहे. म्हणजेच कोणत्या प्रकारच्या शरीरासाठी किती ग्रॅम प्रोटीन लागता, किती विटामिन्स लागतात किती मिनरल्स लागतात हे आपल्याला चांगले ठाऊक आहे. पण म्हणून अन्नच खायचे नाही का? अन्नाऐवजी आपण ही सारी औषधं खाल्ली तर शरीराची गरज पूर्ण होत नाही, उलट शरीराला अपाय होतो.

५. ज्या कारणामुळे वजन वाढलेले आहे त्या कारणावर जर काम केले तर वजन कमी करून फिटनेस मिळवण्यासाठी फायदा होऊ शकतो.
६. आधी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचे मिल रिप्लेसमेंट शेक घेतल्यानंतर लिव्हरवर प्रचंड ताण येतो आणि लिव्हरचे आजार होण्याची शक्यता असते. रोज रोज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन घेतल्यानंतर त्याचा शरीराला उपयोग होतो की नाही हे पाहायला हवे. म्हणजेच तुम्ही भरपूर व्यायाम करत असाल तर या प्रोटीनचा उपयोग होऊ शकतो, परंतु जर शारीरिक हालचाल कमी असेल आणि खूप जास्ती प्रोटीन घेणार असाल तर लिव्हर आणि किडनीचे काम वाढते. त्यामुळे शरीरासाठी कुठलीही अनैसर्गिक गोष्ट करण्याआधी विचार करा.

(Image : google)

करावं काय?

१. आजकाल बाहेरील अन्नपदार्थ तळलेले अन्नपदार्थ किंवा जंक फूड जास्त खाल्ल्यामुळे मुलांचेही वजन वाढते आहे. याच गोष्टी जर कमी केल्या त्याचबरोबर योग्य प्रकारे हेल्दी आहार घेतला तर ज्या स्पीडने वजन वाढले आहे त्याच स्पीडने ते कमी होऊ शकते. होते काय की वजन वाढताना कळत नाही, पण कमी करण्याची मात्र सर्वांनाच घाई असते. एका वर्षामध्ये वजन वाढले असेल तर तेवढे वजन एका महिन्यात कमी व्हावे अशी सगळ्यांची अपेक्षा असते आणि याच गोष्टीचा हे प्रॉडक्ट बनवणारे लोक फायदा घेतात.
२. तुमचे वजन नैसर्गिकरीत्या वाढलेले आहे तर ते नैसर्गिकरीत्या कमी करणे अपेक्षित असते. पण शॉर्टकट्स सगळ्यांनाच हवेहवेसे असतात. त्यामुळे पटकन काहीतरी प्रॉडक्ट वापरून आपण वजन कमी करू शकत असू तर ते छानच वाटते. वजन कमी करताना तो हेल्दी वेटलॉस असावा म्हणजेच वजन कमी केल्यानंतर तुम्हाला एनर्जेस्टिक वाटायला हवे. त्याचबरोबर हलके वाटायला हवे आणि तुमच्या चेहऱ्यावरती जो चार्म आहे तो तसाच टिकायला हवा.

३. थोडक्यात, वजन कमी केल्यानंतर तुमच्या मित्रांनी तुम्हाला आजारी होतास का, असे विचारण्याची वेळ येऊ नये. शरीरात थकवा येऊ नये.
४. ओव्हरऑल वजन कमी करण्यापेक्षा फॅट लॉसवर भर द्यायला हवा. त्याचबरोबर वजन वाढण्याच्या कारणांमध्ये जर औषधे आणि हार्मोन्सचा रोल असेल तर त्यावर व्यवस्थित काम करावे. आहार योग्य असेल तरहवा तसा फिटनेस तुम्ही मिळवू शकता आणि याचेच बायप्रॉडक्ट हे परफेक्ट वजन म्हणजेच तुमचे शरीर योग्य ते वजन धारण करते.
५. फिटनेससाठी शॉर्टकट शोधू नका. त्याचे दूरगामी परिणाम खूप म्हणजे खूप भयंकर आहेत. वजन तर कमी होईल पण वेगवेगळे आजार मागे लागतील.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)
durvamanjiri@gmail.com

Web Title: protein powder-protein shake good for health? what's the side effect on health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.