Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंबरेचा घेर होईल २८ आणि पोट - मांड्याही होतील सुडौल, या एका लालचुटुक फळाचा रस करेल कमाल, सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2026 19:06 IST

pomegranate juice for weight loss : how pomegranate juice helps control hunger & weight loss : चवीला आंबट - गोड - तुरट लागणारा, लालचुटुक डाळिंबाच्या दाण्यांचा रस करेल झटपट वेटलॉस...

सध्याच्या काळात वजन सतत वाढणे ही एक मोठी कॉमन समस्याच झाली आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणांना वजन वाढीचा हा त्रास सतावतो. वाढलेलं वजन आणि पोटाचा व मांड्यांचा वाढता घेर कमी करण्यासाठी डाएट, एक्सरसाइज आणि विविध उपाय करूनही अपेक्षित परिणाम काहीवेळा दिसत नाहीत. इतकंच नाही तर वाढलेले वजन आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपण तासंतास जिममध्ये घालवतो किंवा कडक डाएटिंग करतो. वेटलॉस करण्यासाठी नियमितपणे एक्सरसाइज आणि योग्य आहार घेणे गरजेचे असते(pomegranate juice for weight loss).

वजन कमी करण्यासाठी म्हणून अनेक उपायांसोबतच, आरोग्यदायी पर्याय म्हणून डाळिंबाच्या दाण्यांचा रस फायदेशीर ठरतो. अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि व्हिटॅमिन्सयुक्त डाळिंबाचा रस शरीरातील चरबी कमी करण्यास, पचन सुधारण्यास आणि चयापचय गती वाढवण्यास मदत करतो. योग्य पद्धतीने आणि दररोज हा डाळिंबाच्या दाण्यांचा रस प्यायल्यास वेटलॉस करण्यास मदत होते. डाळिंबाचा रस हा केवळ रक्त वाढवण्यासाठीच नाही, तर शरीरातील चरबी जाळण्यासाठी (how pomegranate juice helps control hunger &  weight loss) देखील अत्यंत गुणकारी मानला जातो. चवीला आंबट - गोड - तुरट लागणारा हा लालचुटुक डाळिंबाच्या दाण्यांचा रस वेटलॉस करण्यासाठी कसा फायदेशीर ठरतो ते पाहूयात. 

डाळिंबाचा रस वजन कमी करण्यास कसा काय फायदेशीर ठरतो ?  १. फायबरचा खजिना:- डाळिंबाच्या दाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. डाळिंबाच्या दाण्यांचा रस अगदी रोज घेतला तर त्यात सॉल्युबल फायबर असतात, ज्यामुळे आपल्याला दीर्घकाळ भूक लागत नाही आणि यामुळे 'ओव्हरईटिंग' टाळता येते. 

२. लो-कॅलरी ड्रिंक :- बाजारात मिळणाऱ्या साखरेच्या पेयांपेक्षा (Cold drinks) डाळिंबाच्या नॅचरल ज्यूसमध्ये खूपच कमी कॅलरीज असतात. डाएटमध्ये साखरेच्या जागी हा पर्याय निवडल्यास वजनावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.

३. मेटाबॉलिझम वाढवतो :- डाळिंबात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील मेटाबॉलिझम म्हणजेच पचनक्रिया वेगवान करतात. जेवढी पचनक्रिया चांगली, तेवढी शरीरातील चरबी लवकर जळते.

४. ट्रायग्लिसराईड्सवर नियंत्रण :- काही संशोधनानुसार, डाळिंबाचा रस शरीरातील हानिकारक ट्रायग्लिसराईड्स कमी करतो, ज्यामुळे रक्तातील चरबी कमी होण्यास मदत होते. 

५. चरबी साठण्यापासून रोखतो :- डाळिंबाचा रस शरीरातील फॅट सेल्स जमा होण्यास आळा घालतो, विशेषतः पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतो.

६. शरीर डिटॉक्स करतो :- डाळिंबाचा रस शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो, ज्यामुळे वजन कमी करताना शरीर अधिक हलके वाटते.

कधी आणि कसा प्यावा डाळिंबाचा रस?

वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत डाळिंबाचा रस पिणे सर्वात फायदेशीर ठरते. यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.  रसात वरून साखर मुळीच टाकू नका. डाळिंबाचा नैसर्गिक गोडवा पुरेसा असतो. पॅकेटमधील ज्यूस पिण्याऐवजी घरी काढलेला ताजा रस प्यावा, जेणेकरून त्यातील पोषक तत्वे टिकून राहतील. वेटलॉस करण्यासाठी जर आपल्याला डाळिंबाचा रस अधिक फायदेशीर करायचा असेल, तर त्यात चिमूटभर सैंधव मीठ आणि काळीमिरी पावडर घाला. यामुळे पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

डाळिंबामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि वाढत्या वयाच्या खुणा देखील कमी होण्यास मदत होते. डाळिंब भूक नियंत्रित करण्यास मदत करते. एका मध्यम आकाराच्या डाळिंबात साधारणपणे १४४ कॅलरीज, ८३% पाणी, ३.५ ग्रॅम फायबर, १४ ग्रॅम नॅचरल साखर असते. 

दररोज डाळिंबाचा रस प्यायल्याने केवळ त्वचेवर चमक येत नाही, तर १२ आठवड्यांत वजन कमी होण्यास आणि कंबरेचा आकार (Waist size) वेगाने कमी होण्यास मदत होते. २०२० साली फूड अँड फंक्शनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, १२ आठवडे दररोज २५० मिली डाळिंबाचा रस प्यायल्याने वेटलॉस होऊन कंबरेचा घेर आणि भूक लागण्याच्या सवयीत भरपूर मोठा फरक दिसून येतो. २०१७ च्या एका अभ्यासानुसार, डाळिंबाचा अर्क भूक लागणाऱ्या संप्रेरकांना कमी करतो आणि पोट भरल्याची जाणीव करून देणाऱ्या घटकांना वाढवतो. 

इतरही गोष्टी लक्षात ठेवा... 

१. संतुलित आहार घ्या. 

२. दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा.

३. पुरेशी झोप घ्या.

४. पाणी जास्त प्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Pomegranate juice slims waist, reduces belly fat: Simple remedy.

Web Summary : Pomegranate juice aids weight loss by boosting metabolism, reducing cravings, and burning fat. Drink daily on an empty stomach for best results. Combine with exercise and a balanced diet for optimal effect. It also detoxifies and improves skin.
टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स