आपल्या दिवसाची सुरुवात सकाळच्या हेल्दी आणि निरोगी नाश्त्याने होते. आपल्याकडील बहुतेक भारतीय घरात शक्यतो इडली, वडा, पराठे, उपमा आणि पोहे यांसारखे पदार्थ नाश्त्याला हमखास केले जातात. असे असले तरी सध्या आपल्यापैकी बरेचजण हेल्थ कॉन्शियस झाले आहेत. आपल्या आरोग्याची काळजी तसेच वेटलॉस (Is Upma or Poha Good for Weight Loss) करण्यासाठी अनेकजण हेल्दी नाश्ता करणेच पसंत करतात(Poha Or Upma Which Is Healthier For Weight Loss Expert Tells).
पोहे आणि उपमा हे दोन्ही आपल्या नाश्त्याचे अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ आहेत. पण जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा पोहे आणि उपमा यापैकी कोणता पदार्थ जास्त फायदेशीर आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहतो. काहींना वाटते पोहे अधिक हलके व पौष्टिक असतात, तर काहीजण उपम्याला पोषणमूल्यांनी परिपूर्ण मानतात. दोन्ही पदार्थ चवदार, झटपट बनणारे आणि पचनास हलके असतात, पण वजन कमी करण्याच्या दृष्टीने नेमकं पोहे आणि उपम्यापैकी नेमकं कोणता पदार्थ खावा (Poha Or Upma For Weight Loss ) यासाठी तज्ज्ञ काय सांगतात ते पाहूयात. दिल्लीतील आहारतज्ज्ञ प्राची छाब्रा यांनी onlymyhealth.com या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीनुसार, वजन कमी करण्यासाठी नेमके पोहे खावेत की उपमा ते पाहा...
वजन कमी करण्यासाठी पोहे खाण्याचे फायदे...
पोहे खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभदायक असतात. पोह्यांमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते, जे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. पोहे खाल्ल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अनावश्यक खाण्याची सवय टाळता येते. यामुळे एकूण कॅलरीजचे प्रमाण कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत होते. यासोबतच, पोहे शरीराला आवश्यक अशी ऊर्जा पुरवतात, जी दिवसभर काम करण्यासाठी गरजेची असते. पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी पोहे उपयुक्त मानले जातात कारण त्यातील घटक चयापचय प्रक्रियेला गती देतात. यामुळे शरीरातील चरबी वाढत नाही आणि पोटाशी संबंधित त्रास उदा. गॅसेस, अपचन यांपासूनही आराम मिळतो. तसेच, पोह्यांमध्ये असलेले काही आवश्यक पोषकद्रव्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात मदत करतात, ज्यामुळे शरीर आजारांना प्रतिकार करू शकते. त्यामुळे वजन कमी करण्यासोबतच एकूण आरोग्यासाठी पोहे हे एक उत्तम व नैसर्गिक पर्याय ठरतात.
Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!
वजन कमी करण्यासाठी उपमा खाण्याचे फायदे...
वेटलॉस करताना उपमा हा देखील एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. उपम्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पोट भरलेले वाटते आणि वारंवार भूक लागत नाही. यामुळे एकूणच जास्त खाणे टाळले जाते आणि वजन नियंत्रणात राहते. उपमा बनवताना त्यात वापरला जाणारा रवा आणि विविध प्रकारच्या भाज्या हे पचनासाठी फायदेशीर असतात. रव्यामध्ये असणाऱ्या पोषणमूल्यांमुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि पोटाशी संबंधित तक्रारी दूर राहतात. शिवाय भाज्यांमुळे उपमाला अतिरिक्त व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात, जे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
सेलिब्रिटी फिटनेस गुरु मिकी मेहता सांगतात, वेटलॉससाठी ७-७-७ चा मंत्र! म्हणून तर ते दिसतात फिट...
वजन कमी करण्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे?
आहारतज्ज्ञ प्राची छाब्रा यांच्यामते, वेटलॉस करताना आपण नाश्त्यात पोहे आणि उपमा दोन्ही समाविष्ट करू शकता. दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत. दोन्ही कार्बोहायड्रेट्सचे चांगले स्रोत आहेत, जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. याचबरोबर, उपमा व पोहे फायबरचे चांगले स्रोत आहेत.
चुकूनही ‘या’ ७ भाज्या शिजतांना पाणी घालू नका, करा वाफेवर! नाहीतर भाजी होईल बेचव...
परंतु, जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी पोहे आणि उपमा खात असाल तर या दोघांपैकी पोहे खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते. खरंतर, पोह्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, जे शरीरातील चरबी नियंत्रित करण्यासाठी आणि वेटलॉस करण्यास देखील मदत करते. पोह्यात उपम्यापेक्षा कमी कॅलरीज असतात. तर, प्रथिनांच्या बाबतीतही उपम्यापेक्षा पोहेच चांगले मानले जातात. वेटलॉस करताना पोहे खाणे फायदेशीर असले तरी, जास्त प्रमाणांत पोहे खाल्ले तर ते आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. म्हणून, पोहे नेहमी मर्यादित प्रमाणातच खावेत.