Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करण्यासाठी ‘हा’ चिनी चहा प्या, झरझर उतरेल चरबी, वाटेल फ्रेश...

वजन कमी करण्यासाठी ‘हा’ चिनी चहा प्या, झरझर उतरेल चरबी, वाटेल फ्रेश...

Oolong Tea Benefits For Weight Loss : Oolong tea for fat burning : Oolong tea fat loss secret : Chinese Oolong tea weight loss : चायनीज ओलोंग टी वेटलॉस करण्यासोबतच आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरतो....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2025 15:54 IST2025-09-20T15:41:57+5:302025-09-20T15:54:59+5:30

Oolong Tea Benefits For Weight Loss : Oolong tea for fat burning : Oolong tea fat loss secret : Chinese Oolong tea weight loss : चायनीज ओलोंग टी वेटलॉस करण्यासोबतच आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरतो....

Oolong Tea Benefits For Weight Loss Oolong tea fat loss secret Chinese Oolong tea weight loss | वजन कमी करण्यासाठी ‘हा’ चिनी चहा प्या, झरझर उतरेल चरबी, वाटेल फ्रेश...

वजन कमी करण्यासाठी ‘हा’ चिनी चहा प्या, झरझर उतरेल चरबी, वाटेल फ्रेश...

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे आजकाल बहुतेकजण वजन वाढण्याच्या समस्येने हैराण आहेत. वजन वाढल्याने शरीरात चरबीचे (Oolong Tea Benefits For Weight Loss) प्रमाण वाढते परिणामी, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित समस्या, रक्तातील साखर आणि आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दिवसेंदिवस वाढत जाणारे वजन कमी करण्यासाठी, आपण अनेक उपाय करतो. झटपट वेटलॉस (Oolong tea for fat burning) करण्यासाठी हर्बल टी, ग्रीन टी पिण्याचा एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे(Oolong tea fat loss secret).

अशातच,  गेल्या काही वर्षांपासून, फिटनेसच्या जगात ओलोंग टी (Oolong Tea) नावाचा एक प्रकार खूप लोकप्रिय झाला आहे. हा चहा चीनमध्ये तयार केला जातो आणि त्याचा वापर वजन कमी करण्यासाठी केला होतो. ओलोंग चहामध्ये असे अनेक (Chinese Oolong tea weight loss) गुणधर्म असतात, जे चयापचय क्रियेचा वेग वाढवण्यास आणि शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात. हा खास प्रकारचा चहा वेटलॉस करण्यासोबतच आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरतो. जयपूर येथील Angelcare-A Nutrition and Wellness Center च्या संचालक, आहार आणि पोषणतज्ज्ञ अर्चना जैन यांच्याकडून वेटलॉस  करण्यासाठी ओलोंग टी पिण्याचे फायदे आणि ती कशी तयार केली जाते ते पाहूयात. 

१. चायनीज ओलोंग टी म्हणजे नेमकं काय ? 

ओलोंग चहा (Oolong Tea) हा एक पारंपारिक चायनीज चहा आहे, जो कॅमेलिया सिनेन्सिस (Camellia sinensis) नावाच्या रोपाच्या पानांपासून बनवला जातो. हा चहा ब्लॅक टी आणि ग्रीन टी यांच्यासारखाच एक प्रकार आहे. ओलोंग टीमध्ये ग्रीन टी आणि ब्लॅक टी या दोन्हीचे गुणधर्म असतात. त्याची चव हलकी गोडसर असते. चायनीज ओलोंग टी (Oolong Tea) ही एक प्रकारची हर्बल टी आहे. मेटाबॉलिझम वाढवणे, फॅट बर्निंगला मदत करणे आणि शरीराला इन्स्टंट एनर्जी देते  यामुळे ओलोंग टी वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय मानली जाते.

डॉक्टर सांगतात, 'ही' ३ फळं म्हणजे मुलांसाठी सुपरफूड! बुद्धी, ताकद आणि एनर्जी वाढेल वेगाने...

२. चायनीज ओलोंग टी कशी तयार करायची ?

ओलोंग टी तयार करण्यासाठी, ग्लासभर गरम पाण्यांत ओलोंग टी बॅग, १/४ चमचा सुंठ पावडर आणि १/८ चमचा दालचिनी पावडर घाला. हे मिश्रण ५ मिनिटांसाठी तसेच ठेवा. त्यानंतर ते गाळून प्या. 

३. वेटलॉससाठी ओलोंग टी कधी आणि कशी प्यावी ?

वेटलॉस करण्यासाठी ओलोंग टी जेवणाच्या ३० मिनिटे आधी किंवा नंतर पिऊ शकता. यासोबतच व्यायामापूर्वी पिणे देखील फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास, माइंडफूल इटिंग करण्यास तसेच तणाव कमी करण्यास आणि पोषक तत्वांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते. 

हिमोग्लोबिन ९ पेक्षाही कमी, तब्येतीला धोका? खा ‘हे’ ७ सुपरफूड, हिमोग्लोबिन वाढेल भरभर....

४. चायनीज ओलोंग टी पिण्याचे फायदे... 

१. आहार आणि पोषणतज्ज्ञ अर्चना जैन यांच्या मते, ओलोंग टीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्ससारखी पोषक तत्त्वे असतात, तसेच त्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. ओलोंग टी प्यायल्यास वजन कमी करण्यास आणि शरीरात जमा झालेली चरबी घटवण्यास मदत मिळते.

२. ओलोंग टी प्यायल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढण्यास मदत होते. यामुळे शरीरातील कॅलरी जलद गतीने बर्न होतात, ज्यामुळे शरीरातील चरबी देखील कमी होते.

३. ओलोंग टी प्यायल्याने शरीरात चरबीचे (fat) जास्त शोषण होण्यास प्रतिबंध होतो, ज्यामुळे शरीरात जमा होणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण कमी होते आणि पचनासाठी आवश्यक असलेल्या एन्झाईम्सना प्रोत्साहन मिळते.

४. ओलोंग टी प्यायल्याने भूक कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे शरीरातील कॅलरीज कमी होतात आणि वारंवार लागणारी छोटी भूक नियंत्रित होते. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.

५. बद्धकोष्ठता, ब्लोटिंग यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारते, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

६. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, गोड खाण्याची इच्छा कमी होते आणि वेटलॉस करण्यास मदत मिळते.

Web Title: Oolong Tea Benefits For Weight Loss Oolong tea fat loss secret Chinese Oolong tea weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.