बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या फिटनेस आणि हेल्दी लाईफस्टाईलसाठी ओळखली जाते. नेहा कायमच स्वतःला फिट अँड फाईन व फिगर मेंटेन्ड ठेवण्यासाठी डाएट व एक्सरसाइजसोबतच अनेक घरगुती उपाय करत (Neha Dhupia wellness challenge) असते. नेहा सोशल मिडियावर फारच ॲक्टिव्ह असते सोबतच ती तिच्या वर्कआऊटचे वेगवेगळे व्हिडिओ देखील सतत सोशल मिडीयावर शेअर करते. अशातच नुकतेच, पुन्हा एकदा तिने तिच्या हेल्दी फिटनेस रुटीनमधील एक खास सिक्रेट शेअर केले आहे(Neha Dhupia ayurvedic kadha recipe).
सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे शरीरातील वाढलेली अंतर्गत सूज (Inflammation) आणि त्यामुळे वाढणारे वजन ही अनेक लोकांची समस्या आहे. याच समस्येवर मात करण्यासाठी, नेहाने कोणतीही महागडी औषधे किंवा सप्लिमेंट्स न घेता, आपल्याच स्वयंपाकघरातील साहित्यातून तयार केलेला एक खास औषधी काढा २१ दिवस नियमितपणे पिण्याचे 'वेलनेस चॅलेंज' स्वीकारले. नेहाने स्वीकारलेले हे २१ दिवसांचे 'वेलनेस चॅलेंज' म्हणजे नेमकं काय आणि तिने हा खास काढा कसा तयार केला यांचे सिक्रेट पाहूयात.
नेहा धुपियाचे 'वेलनेस चॅलेंज' म्हणजे नेमकं काय ?
नेहाने एका सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टबरोबर तिच्या चाहत्यांना २१ दिवसांसाठी एक खास घरगुती काढा पिण्याचे चॅलेंज दिले. या चॅलेंजेसोबतच नेहाचा दावा आहे की, २१ दिवस सतत हा काढा प्यायल्याने शरीरातील अंतर्गत सूज कमी होते. नेहाने सांगितले की, हे ती चॅलेंज स्वीकारत आहे. ती म्हणाली, 'मी हे चॅलेंज स्वीकारले आहे. माझ्यासाठी हे शरीरातील अंतर्गत सूज कमी करण्यासाठी २१ दिवसांचे चॅलेंज आहे.' या व्हिडिओद्वारे तिने चाहत्यांनादेखील चॅलेंज केले आहे.
कसा करायचा हा खास घरगुती काढा...
आहारतज्ज्ञ रिचा गंगानी यांनी नेहाला २१ दिवस दररोज हळद-आले, काळी मिरी व कलौंजी यांचे पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. हा काढा प्यायल्याने चयापचय चांगले होऊन, चरबी वेगाने जळू लागते. अशी माहिती अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आहे. नेहा धुपिया हीचा सिक्रेट घरगुती काढा तयार करण्यासाठी आपल्याला, कच्ची हळद, आलं, काळीमिरी, कलोंजी आणि नारळाचे तेल, साजूक तूप, ऑलिव्ह ऑईल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
डार्क सर्कल्सचा रंग सांगतो शरीरातील पोषक तत्वांची कमतरता! दुर्लक्ष करणे पडते महागात...
कच्ची हळद, आले, काळीमिरी आणि कलौंजी एका मिक्सर जारमध्ये थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या. त्यानंतर, तयार झालेला हा काढा आइस ट्रेमध्ये भरून फ्रीजमध्ये गोठवण्यासाठी ठेवून द्या. रोज सकाळी, या मिश्रणाचा एक बर्फाचा तुकडा काढा आणि तो गरम पाण्यात मिसळा. यासोबतच, या पाण्यात १ चमचा एमसीटी (MCT) तेल (MCT Oil) नसेल तर त्याऐवजी नारळाचे तेल, साजूक तूप किंवा ऑलिव्ह तेल यांपैकी कोणतेही एक तेल मिसळून पिऊ शकता.
२१ दिवस हा काढा पिण्याचे फायदे...
१. कच्च्या हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा एक सूज-विरोधी मुख्य घटक असतो, जो शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतो.
२. आल्यामध्ये जिंजरोल आणि शोगोल सारखे पोषक घटक असतात, जे शरीरातील सूज कमी करण्यात उपयुक्त ठरतात.
३. काळ्या मिरीमध्ये पिपेरिन नावाचा घटक आढळतो, जो शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतो.
४. कच्ची हळद, आले आणि कलौंजीमध्ये असणारे अँटिऑक्सिडेंट गुणधर्म स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात.
५. या काढ्यामध्ये असलेली कच्ची हळद आणि आलं सूज-विरोधी गुणधर्मांमुळे संधिवात आणि सांधेदुखीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.