शितल मोगल (आहार तज्ज्ञ आणि वर्कआउट प्लॅनर)
औषधं भोजनम भवेत , असे म्हणतात. म्हणजे अन्नच औषध असते. अशा या औषधी गुणांनीयुक्त एक गोष्ट म्हणजे "मेथी ". हा एक महत्त्वाचा घटक आहे प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात मेथ्या असतातच.
मेथीची पाने भाजी म्हणून वापरली जातात तर दाणे मसाल्यात ,लोणच्यात आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जातात. यात प्रथिने तंतुमय पदार्थ (fibre), लोह (iron), कॅल्शियम, फॉस्फरस मॅग्नेशियम विटामिनA,B,C,K असतात.
औषधी गुणधर्म कोणते?
आम्लपित्त गॅस अपचन यावर गुणकारी.
कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तीने नियमित रात्री भिजवलेल्या मेथ्या पाण्यासहित काही दिवस सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात येतो. याच्या नियमित सेवनाने सांधेदुखी व सूज कमी होते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.
मोड आलेल्या मेथ्यांचा लेप केसांना नियमित लावल्याने केस गळती व कोंडा कमी होतो. रिकाम्या पोटी भिजवलेली मेथीचे दाणे खाल्ल्यास बुक नियंत्रणात राहते परिणामी लठ्ठ व्यक्तींना वजन कमी करण्यास उपयुक्त.
PCOS आणि PCOD यावर फायदेशीर. प्रसूतीनंतर गर्भवती महिलांसाठी अतिशय उपयुक्त. मोड आलेल्या मेथ्या रोजच्या आहारात किंवा सॅलडमध्ये अर्धा चमचा किंवा एक चमचा खाव्यात.
कुणी खाऊ नये?
यांच्या अतिसेवनाने पोटात मुरडा येणे काहींना ऍलर्जी किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधांबरोबर अडचण येऊ शकते गर्भवती महिलांनी जास्त मेथ्यांचा वापर टाळावा. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी यांचे सेवन करू नये
मेथीचा गुणधर्म उष्ण असतो म्हणून पावसाळा व हिवाळ्यात शक्यतो खावे. उन्हाळ्यात याचे सेवन टाळावे
मेथी व मेथीचे दाणे हे आहारात औषधा समान आहेत योग्य प्रमाणात सेवन केल्याने त्याचे अनेक फायदे होतात. आपल्या दैनंदिन आहारात मेथ्यांचा समावेश औषध रुपात करावा.
संपर्क शीतल मोगल : 8605243534