वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर वॉकिंग आणि हेल्दी डाएट रुटीनही महत्वाचे असते तरच तुमचं वजन वेगानं कमी होऊ शकतं. जर तुम्हाला लठ्ठपणा सतावत असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करू शकता. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वॉकिंग, व्यायाम केल्यानं नाश्त्याला लापशी म्हणजेच दलिया खाल्ल्यास वजन कमी करण्यास मदत होईल. महिनाभर नियमित तुम्ही दलियाचे सेवन केले तर वजनात सकारात्मक परिणाम दिसून येईल. याशिवाय कोणता ना कोणता व्यायाम जरूर करा ज्यामुळे तुमची तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. (Most Healthy Breakfast Recipe For Weight Loss Vegetable Dalia Recipe Eat This Food For One Month To Lose Weight)
लापशी म्हणजेच गव्हाची भरड यांत भरपूर फायबर्स आणि प्रोटीन असते. दलिया खाल्ल्यानं शरीराला व्हिटामीन बी-१२ मिळते. दलिया लो कॅलरी फूड असल्यामुळे चापती आणि भाताच्या तुलनेत यात कमी कॅलरीज असतात. जर तुम्ही रोज १ महिना फक्त लापशी म्हणजेच दलियाचे सेवन केले आणि चांगला वर्क आऊट रुटीन फॉलो केला तर एका महिन्यात तुमचे ४ ते ५ किलो वजन कमी होण्यास मदत होईल. याशिवाय गोड पदार्थ, तळलेले पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करू नका. दिवसाचे २ मोठे मील नाश्ता आणि डिनरमध्ये तुम्ही दलियाचा समावेश करू शकता.
दलियाचा आहारात समावेश केल्यानं काय फायदे होतात?
दलियामध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पचनक्रिया चांगली राहते. थोडासा दलिया खाल्ल्यानंही बराचवेळ पोट भरलेलं राहतं. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते.
याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी हा उत्तम नाश्ता आहे. यामध्ये मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस यांसारखी खनिजं असतात जी शरीराला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही दुधासोबत दलिया खाल्ला तर त्यातून प्रथिनं चांगल्या प्रमाणात मिळतील. जे स्नायूंच्या बळकटीसाठी आवश्यक आहेत.
Web Summary : Struggling to lose weight? Incorporate dalia (broken wheat) into your daily breakfast routine. Dalia is rich in fiber and protein, keeps you full for longer, aids digestion, and helps in reducing 4-5 kg weight in a month with exercise. It is also beneficial for diabetes.
Web Summary : वजन घटाने के लिए परेशान हैं? अपनी दैनिक नाश्ते की दिनचर्या में दलिया (टूटा हुआ गेहूं) शामिल करें। दलिया फाइबर और प्रोटीन से भरपूर होता है, यह आपको लंबे समय तक भरा हुआ रखता है, पाचन में सहायता करता है, और व्यायाम के साथ एक महीने में 4-5 किलो वजन कम करने में मदद करता है। यह मधुमेह के लिए भी फायदेमंद है।