Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > भरपूर व्हिटामीन B-12 हवं तर रोज खा ‘या’ डाळीचं वरण, हाडंही होतील मजबूत आणि नजरही चांगली

भरपूर व्हिटामीन B-12 हवं तर रोज खा ‘या’ डाळीचं वरण, हाडंही होतील मजबूत आणि नजरही चांगली

Vitamin B-12 Veg Foods : मूग डाळ खाल्ल्यानं शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 07:54 IST2025-08-13T16:23:21+5:302025-08-14T07:54:29+5:30

Vitamin B-12 Veg Foods : मूग डाळ खाल्ल्यानं शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासत नाही.

Moong Dal For Vitamin B-12 Deficiency Vitamin B-12 Veg Foods | भरपूर व्हिटामीन B-12 हवं तर रोज खा ‘या’ डाळीचं वरण, हाडंही होतील मजबूत आणि नजरही चांगली

भरपूर व्हिटामीन B-12 हवं तर रोज खा ‘या’ डाळीचं वरण, हाडंही होतील मजबूत आणि नजरही चांगली

किचनमध्ये बरेच असे पदार्थ असतात ज्याच्या सेवनानं शरीराला फायदे मिळतात. तुम्ही योग्य पद्धतीनं काही पदार्थांचे सेवन केले तर शरीरात काही घटकांची कमतरता उद्भवण्यापासून वाचवता येईल. मूग डाळ सर्व डाळींमध्ये पचायला हलकी असते. जास्तीत जास्त लोक मूग डाळीचे सेवन करतात. खिचडी, भाज्या, पराठा अशा अनेक पदार्थांमध्ये मूग डाळ असते. मूग डाळ खाल्ल्यानं शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. (Vitamin B-12 Veg Foods)

क्लाऊडनाईन केअरच्या तज्ज्ञांच्यामते हिरवी मुगाची डाळ अधिक पौष्टीक असते.व्हिटामीन बी-१२ असं तत्व आहे जे शरीरात डिएनए बनवण्यासाठी आणि शरीराच्या पेशींना उर्जा देण्यास मदत करतात. या व्हिटामीन्सच्या कमतरतेनं एनिमीया, थकवा, कमकुवतपणा अशा समस्या उद्भवतात. अशा स्थितीत व्हिटामीन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही सप्लिमेंट्सचा आधार घेण्यापेक्षा व्हिटामीन बी-१२ असलेल्या प्राकृतिक पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. रोजच्या जेवणात काही बदल केल्यास हे शक्य होईल. (Moong Dal For Vitamin B-12 Deficiency Vitamin B-12 Veg Foods)

व्हिटामीन बी-१२ मिळवण्यासाठी आहार आणि लाईफस्टाईलमध्ये काही बदल करायला हवेत. व्हिटामीन बी-१२ मांसाहारात जास्त असते असा समज आहे पण किचनमध्ये उपलब्ध असलेल्या व्हेज पदार्थांमध्येही बी-१२ भरपूर असते. याव्यतिरिक्त या डाळीत व्हिटामीन बी१, बी६ असते जे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी गरजेचे असते. मूग डाळीतील व्हिटामीन ए डोळयांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. यामुळे नाईट ब्लाईंडनेससुद्धा कमी होतो. हाडं मजबूत होतात. व्हिटामीन सी सुद्धा यात असते. ज्यामुळे इम्यून सिस्टीम मजबूत होते. संक्रमणापासून लढता येतं आणि जखम लवकर बरी होण्याासही मदत होते.

व्हिटामीन बी-१२ चा स्त्रोत मुगाची डाळ

रात्री झोपण्याआधी मूग डाळ व्यवस्थित धुवून साफ करून घ्या. त्यानंतर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी डाळ व्यवस्थित भिजल्यानंतर या डाळीच्या पाण्याचं सेवन करा. भात किंवा चपातीसोबत तुम्ही या डाळीचं वरण खाऊ शकता. ही डाळ शिजवताना कांदा, लिंबू घालूनही सेवन करू शकता. सकाळच्या नाश्त्याला तुम्ही मूग डाळीचा डोसा खाऊ शकता. सॅलेड, किंवा हलवा, खिचडी, स्प्राऊट्समध्ये घालून खाऊ शकता. यामुळे पोट जड वाटत नाही आणि दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं.

Web Title: Moong Dal For Vitamin B-12 Deficiency Vitamin B-12 Veg Foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.