Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोज रात्री दुधात ‘हा’ पदार्थ घालून प्या, सुटलेलं पोट होऊ लागेल सपाट - सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2026 15:32 IST

milk with cinnamon for weight loss at night : cinnamon milk for weight loss : वजन कमी झालं तरी पोट कमी होत नाही, अशावेळी करुन पाहा हा उपाय

वाढतं वजन आणि सुटलेलं पोट ही आजच्या काळात अनेकांसाठी डोकेदुखीच ठरत आहे. वाढलेलं वजन, पोटाची ढेरी कमी करण्यासाठी आपण तासंतास  जिममध्ये घाम गाळतो, डाएट करतो आणि नवनवीन उपाय शोधत असतो. पण इतके प्रयत्न करूनही अनेकदा वजनाचा काटा हलत नाही आणि पदरी निराशा येते. याचं मुख्य कारण म्हणजे आपण आपल्या व्यायामावर जेवढा भर देतो, त्या तुलनेत आपल्या रोजच्या खाण्यापिण्यातील छोट्या पण महत्त्वाच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो. जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल, तर सगळ्यांतआधी तुमच्या आहाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी गोड पदार्थ टाळणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं(milk with cinnamon for weight loss at night).

वजन कमी करताना सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे 'साखर'. आपण दिवसभर साखर टाळतो, पण रात्रीच्या एका चुकीच्या सवयीमुळे आपले सगळे प्रयत्न वाया जातात. आपल्यापैकी काही (cinnamon milk for weight loss) जणांना रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर दूध पिण्याची सवय असते. दूध हे पूर्णान्न असले तरी, त्यात चवीसाठी टाकलेली साखर  शरीरातील कॅलरीज आणि फॅट्स वाढवण्यास कारणीभूत ठरते.  परंतु हेच रात्रीचं दूध तुमच्यासाठी 'फॅट बर्नर' म्हणून काम करू शकतं, जर तुम्ही त्यात साखरेऐवजी दालचिनी या मसाल्याच्या पदार्थाचा वापर केला तर! दालचिनीमध्ये असे काही नैसर्गिक गुणधर्म आहेत जे मेटाबॉलिझम वेगवान करतात आणि झोपेतही तुमची चरबी जाळण्यास मदत करतात. साखरेचं दूध (benefits of cinnamon milk before bed for weight loss) पिण्याऐवजी 'दालचिनी दूध' घेतल्यास वजन कमी होण्यासोबतच पचनही सुधारते.

रात्री दालचिनीचे दूध प्यायल्याने वजन होईल कमी...

जर तुम्हांला वजन कमी करुन कायमसाठी नियंत्रित करायचे असेल, तर सर्वात आधी दुधामध्ये दालचिनी मिसळून पिण्यास सुरुवात करा. यासाठी एक पॅन घ्या, त्यात दूध आणि दालचिनीची थोडीशी पूड घालून ते चांगले उकळवून घ्या. आता रोज रात्री झोपण्यापूर्वी असे दालचिनी घातलेले दूध आवर्जून ग्लासभर प्या.  यामुळे वजन अत्यंत वेगाने कमी होऊ शकते.

घरचं सकस अन्न-वेळेवर जेवण आणि ढीगभर पत्थ्य पाळूनही शुगर ‘हाय’! डॉक्टर सांगतात ३ चुका...

वेटलॉस करण्यासाठी दालचिनीचे दूध कसे फायदेशीर ठरते ? 

'अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन'नुसार, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर दूध आणि दालचिनी हे तुमच्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय असू शकतो. हे स्नायूंची निर्मिती करून शरीरावरील थुलथुलीत चरबी कमी करण्यास मदत करते.

१. दूध हे प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे मांसपेशींचा विकास होतो आणि शरीर सुदृढ राहते.

२. दुधामध्ये 'पेप्टाइड YY' (Peptide YY) नावाचा मुख्य घटक असतो, जे भूक नियंत्रित ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत करते.

आलिया भट, क्रिती सॅनॉनचं फिटनेस सिक्रेट- एकतास नको, अर्धातासही नको-रोज सकाळी करा १० मिनिटं मायक्रो वर्कआऊट!

३. दूध कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. कॅल्शियममुळे शरीराचे मेटाबॉलिझम बूस्ट होते, परिणामी शरीरातील अतिरिक्त कॅलरीज वेगाने बर्न होतात.

४. दुधामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी १२ आणि कॅल्शियम यांसारखी पोषक तत्वे असतात, जी वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

वाढते वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही रात्रीच्या वेळी दुधात दालचिनी पूड मिक्स करून प्यायले, तर अवघ्या काही दिवसांतच तुम्हाला उत्तम निकाल पाहायला मिळू शकतो. मात्र, यासोबतच तुम्हाला तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे देखील तितकेच गरजेचे असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Drink This in Milk at Night for a Flat Stomach

Web Summary : Struggling with weight? Add cinnamon to your nightly milk. Cinnamon boosts metabolism and burns fat while you sleep. This simple change aids weight loss, improves digestion, and can lead to a flatter stomach when combined with diet and exercise.
टॅग्स :वेट लॉस टिप्सहोम रेमेडीफिटनेस टिप्स