Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > मिलिंद सोमणचं १० मिनिटांच फिटनेसचं सिक्रेट! जीमला न जाता स्लिम होण्यासाठी महिलांना सल्ला

मिलिंद सोमणचं १० मिनिटांच फिटनेसचं सिक्रेट! जीमला न जाता स्लिम होण्यासाठी महिलांना सल्ला

Milind Soman's Fitness Secret : मिलिंद सोमण १० मिनिटांचा व्यायाम करतात. त्यांनी सांगितले की फिट राहण्यासाठी लोक हेवी वर्कआऊट आणि क्रॉसफिटच्या मागे धावत आहे. पण फिट राहणं तितकंच सोपं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:08 IST2026-04-02T15:49:57+5:302026-04-02T16:08:37+5:30

Milind Soman's Fitness Secret : मिलिंद सोमण १० मिनिटांचा व्यायाम करतात. त्यांनी सांगितले की फिट राहण्यासाठी लोक हेवी वर्कआऊट आणि क्रॉसफिटच्या मागे धावत आहे. पण फिट राहणं तितकंच सोपं आहे.

Milind Soman's Fitness Secret : Milind Soman Shared 10 Minutes Workout For Womens Fitness | मिलिंद सोमणचं १० मिनिटांच फिटनेसचं सिक्रेट! जीमला न जाता स्लिम होण्यासाठी महिलांना सल्ला

मिलिंद सोमणचं १० मिनिटांच फिटनेसचं सिक्रेट! जीमला न जाता स्लिम होण्यासाठी महिलांना सल्ला

अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) आपल्या फिटनेसमुळे आणि हॉट शरीरयष्टीमुळे कायम चर्चेच असतो. त्यांच्यामते जीममध्ये जाऊन तासनतास घालवून व्यायाम करण्याची काहीच गरज नाही. रोज फक्त १० मिनिटांचा व्यायाम करून तुम्ही फिट राहू शकता. ६० वर्षांच्या मिलिंद सोमणने  Wion World Pulse Summit मध्ये त्यांनी आपल्या फिटनेसबद्दल सांगितले. (Milind Soman's Fitness Secret)

मिलिंद सोमण १० मिनिटांचा व्यायाम करतात. त्यांनी सांगितले कि फिट राहण्यासाठी लोक हेवी वर्कआऊट आणि क्रॉसफिटच्या मागे धावत आहे. पण फिट राहणं तितकंच सोपं आहे.  महिलासुद्धा ही ट्रिक फॉलो करू शकतात. (Milind Soman Shared 10 Minutes Workout For Women's Fitness)

 शिस्त सर्वात महत्वाची

 महिलांवर घर, ऑफिस, मुलं सगळ्यांची जबाबदारी असते. त्यामुळे स्वत:साठी वेळ काढणं कठीण होतं.  पण जीमला जायला जमत नसेल तर १० मिनिटांचे बॉडीवेट ट्रेनिंग किंवा सुर्य नमस्कर करून तुम्ही मेटाबॉलिझ्म  एक्टिव्ह ठेवू शकता.

महिलांसाठी फिटनेसचा खरा अर्थ काय

महिलांच्या शरीरातील हॉर्मोनल बदल जसं की पिरिएड्स, मेनोपॉझ किंवा प्रेंग्नंसी थकव्याचं कारण ठरतात असं मिलिंद सांगतात. जड वजन उचलण्याऐवजी तुम्ही मांसपेशींची लवचीकता आणि मजबूतीवर लक्ष द्यायला हवं.

डाएट आणि मानसिक संतुलन

फक्त १० मिनिटांचा व्यायाम आणि खाण्यापिण्याच्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. मिलिंद सोमण नेहमी साधं, घरचं जेवण खातात. महिलांनी हे समजून घ्यायला हवं.

मानसिकता बदला

मिलिंद सांगतात की फिट राहणं कठीण नाही. तुम्ही आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवू शकता. तुम्हाला कोणत्याही पार्कमध्ये चालणं असो किंवा घरची कामं करणं असो आपल्या डेली रुटीनचा एक भाग बनवू शकता.

मिलिंद नाश्त्याला नारळपाणी, फळं किंवा ड्राय फ्रुट्स खातात त्यांच्या म्हणण्यांनुसार यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या  एनर्जी मिळते. मिलिंद फास्ट फूड किंवा प्रोसेस्ड फूड अजिबात खात नाहीत. त्यांच्या म्हणण्यांनुसार ज्या गोष्टी नैसर्गिकरित्या तयार होतात त्याच आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात.

दुपारच्या जेवणाला घरी केलेलंच जेवण खातात. संध्याकाळचं जेवण ब्राऊन राईस, डाळ, हिरव्या भाज्या हे असते. जेवल्यानंतर ते कधीच पाणी पित नाहीत. थोड्या वेळानं नारळ पाणी किंवा ताक पितात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

Web Title : मिलिंद सोमन का 10 मिनट का फिटनेस सीक्रेट: महिलाओं के लिए स्लिमिंग टिप्स

Web Summary : मिलिंद सोमन ने बताया फिटनेस का राज: रोजाना सिर्फ 10 मिनट का बॉडीवेट ट्रेनिंग या सूर्य नमस्कार। उन्होंने निरंतरता पर जोर दिया और महिलाओं के लिए भारी वजन उठाने के बजाय मांसपेशियों के लचीलेपन को प्राथमिकता दी। साधारण घर का बना भोजन और प्रोसेस्ड फूड से परहेज उनके आहार की कुंजी है।

Web Title : Milind Soman's 10-Minute Fitness Secret: Slimming Tips for Women.

Web Summary : Milind Soman reveals his fitness secret: just 10 minutes of daily bodyweight training or Surya Namaskar. He emphasizes consistency and prioritizes muscle flexibility over heavy lifting for women. Simple home-cooked meals and avoiding processed foods are key to his diet.