Join us

पोट लटकतंय-मांड्या दांडग्या दिसतात? १ चमचे मेथीचे दाणे 'या' पद्धतीनं घ्या, झरझर उतरेल चरबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 08:40 IST

Methi Dana Fenugreek Seeds For Weight Loss : मेथीचे दाणे फक्त एक पौष्टीक पदार्थ नसून मेथीच्या दाण्यांचे बरेच फायदे आहेत.

आजकाल वजन (Weight Gain) वाढण्याची समस्या प्रत्येकालाच उद्भवते. किचनमध्ये ठेवलेली छोटी वस्तूसुद्धा तुमच्या उत्तम तब्येतीचा खजिना असू शकते. मेथीचे दाणे फक्त एक पौष्टीक पदार्थ नसून मेथीच्या दाण्यांचे बरेच फायदे आहेत. मेथीचे दाणे शुगर लेव्हल कमी करण्यापासून केसांची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. एसिडीटी किंवा गॅसेसची समस्या अनेकांना जाणवते. अशावेळी मेथीचे दाणे कोणत्याही औषधापेक्षा तुमचं काम अधिक सोपं करू शकतात. (Methi Dana Fenugreek Seeds For Weight Loss Benefits For Health And Weight Loss)

यात डायटरी फायबर्स असतात हे पोट हेल्दी ठेवतात आणि पचनक्रिया मजबूत बनवण्यास मदत करतात. डायबिटीसच्या रुग्णांसाठी मेथी एखाद्या वरदानाप्रमाणे आहे. यातील फायबर्स ब्लड शुगर कंट्रोल करतात आणि मेटाबॉलिझ्म वाढवून शरीर एक्टिव्ह आणि एनर्जेटीक बनवतात.

मेथीच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्याने, भारतीय पोषणतज्ज्ञ वजन कमी करण्याच्या आहाराचा भाग म्हणून मेथीच्या पाण्याचा वापर करण्याची शिफारस करतात. जेव्हा तुम्ही मेथीचे दाणे खाता, तेव्हा हा तंतुमय पदार्थ पोटात गेल्यावर पाणी शोषून घेतो आणि फुलतो. यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. पोट भरल्यामुळे आपोआप जास्त खाणे आणि वारंवार स्नॅकिंग करण्याची सवय कमी होते, ज्यामुळे कॅलरीचे एकूण सेवन कमी होते.

छोले भिजवायला विसरलात? आयत्यावेळी 3 ट्रिक्स करा, झटपट मऊ होतील छोले-पटकन शिजतील

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर मेथीचे दाणे तुमचा प्रवास अधिक सोपा बनवू शकतात. रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास भूक कमी लागते आणि बराचवेळ पोट भरलेलं राहतं. ज्यामुळे ओव्हरइटींग टाळता येतं आणि हळूहळू वजन कमी होतं.

दसऱ्याला फक्त १ आपट्याचं पान चावून खा, ५ रोगांपासून मिळेल आराम-वाचा फायदे

मेथीचे दाणे फक्त पोटच नाही तर हृदय आणि सौंदर्य चांगले ठेवण्यातही मदत करतात. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होते आणि हृदय रोगाचा धोका कमी होतो. याशिवाय केस गळणं कमी होतं. त्वचेशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.

मेथीच्या दाण्यांचे सेवन कसे करावे?

एका अभ्यासानुसार मेथीमधील फायबरचे सेवन केल्यास जेवणात कॅलरीचे सेवन (Calorie intake) कमी होते. एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्यापोटी या पाण्याचे सेवन करा आणि हे दाणे चावून खा किंवा दाणे नको असल्यास गाळून या पाण्याचे सेवन करा. काही दिवसातंच तुम्हाला फरक दिसून येईल. मेथीमध्ये असलेल्या सोल्यूबल फायबर्समुळे पोट भरल्यासारखं वाटतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Lose belly fat: Fenugreek seeds for weight loss, improved digestion.

Web Summary : Fenugreek seeds aid weight loss by promoting fullness and reducing calorie intake. They improve digestion, control blood sugar, lower cholesterol, and benefit hair and skin. Consume soaked seeds daily for best results.
टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य