मार्गशीर्ष महिन्यातील (Margashirsha Guruvar 2025 ) गुरूवारचे व्रत हे सुख, शांती आणि समृद्धीसाठी केलेलजाते. या उपवासाचे नियम आणि आहारासंबंधी माहिती खालीप्रमाणे आहे. हा उपवास प्रामुख्यानं देवी महालक्ष्मीला समर्पित असतो आणि विवाहीत स्त्रियांसह अनेक भक्त धन, ऐश्वर्य आणि कुटूंबाच्या कल्याणासाठी करतात तर काहीजण पोटाला आराम म्हणून हा उपवास करतातअनेकजण फलाहार किंवा सात्विक आहार घेऊन उपवास करतात. (Do's And Dont's Of Margashirsha Guruvar)
मार्गशीर्ष गुरूवारच्या उपवासाला काय खावे?
अनेकजण फळं सफरचंद, केळी, द्राक्षे, डाळिंब या फळांचा आहारात समावेश करतात. दूध आणि दुधाचे पदार्थ दही, ताक, खीर यात साबुदाणा किंवा राजगिरा वापरू शकता. शेंगदाणे, राजिगीरा, साबुदाणा, बटाटा, रताळे आणि शिंगाड्याचे पीठ यांपासून बनवलेले पदार्थ खावेत. सैंधव मीठ वापरून केलेले पदार्थ उपवासाला चालतात. नेहमीच्या मिठाचे सेवन टाळावे. गूळ किंवा खजूर यांसारखे ऊर्जा देणारे पदार्थ आहारात घ्यावेत. नैवेद्य म्हणून गोड पदार्थ बनवून तो देवीला अर्पण करून नंतर उपवास सोडल्यास उत्तम.
नुकतंच लग्न झालं, पायात घालायची आहेत चांदीची जोडवी; पाहा ८ युनिक ट्रेडिंग डिझाईन्स
उपवासात काय टाळावे?
स्वयंपाकात सामान्य मीठ वापरू नये. काहीजण कांदा, लसूण खाणं टाळतात. गहू, तांदूळ, डाळी, हरबरा, मूग, मसूर राजमा यांसारखी धान्य आणि कडधान्य खाऊ नयेत. हा उपवास शारीरिक क्षमतेनुसार केला जातो. जर तुम्ही पूर्ण उपवास करत नसाल तर सात्विक फलाहार घ्या.
उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून काय करावं?
उपवासाच्या दिवशी शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून दिवसभर पुरेसे पाणी, लिंबू सरबत (उपवासाला चालणारे), ताक किंवा फळांचे रस घेत राहा. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही.
एकाच वेळी खूप जास्त उपवासाचे पदार्थ खाऊ नका. त्याऐवजी, दर ४ ते ५ तासांनी थोडे-थोडे आणि पौष्टिक पदार्थ खा. यामुळे ॲसिडिटी होण्याचा किंवा एकदम भूक लागण्याचा त्रास कमी होईल.
नव्या नवरीसाठी चांदीचे नाजूक पैंजण; १० डेलिकेट डिझाईन्स, पायात एकदम सुंदर दिसतील
थंडीत शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. त्यामुळे आहारात गूळ, शेंगदाणे, सुकामेवा, खजूर, राजगिरा यांसारख्या ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. हे पदार्थ तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करतील. उपवासाला चालणारी फळे, रताळे आणि शिंगाडे यांसारखी कंदमुळे खा.
हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात आणि उपवासालाही चालतात. थंडीमुळे जास्त प्रमाणात चहा-कॉफी पिणे टाळा. रिकाम्या पोटी जास्त चहा-कॉफी घेतल्यास ॲसिडिटी होऊ शकते. त्याऐवजी तुम्ही हर्बल टी (Herbal Tea) किंवा उपवासाला चालणारे दूध घेऊ शकता.
